Join us

Ind Vs Pak: दुरावा मिटला! बऱ्याच वर्षांनी अनुष्का आणि रितिका दिसल्या एकत्र

ICC CWC 2023, Ind Vs Pak: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि भारताचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका या दोघीही एकत्र बसून सामन्याचा आनंद घेताना दिसल्या. त्यामुळे चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 19:54 IST

Open in App

विश्वचषक स्पर्धेत आज पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या लढतीत भारतीय संघा मजल दरमजल करत विजयाच्या दिशेने आगेकूच करत आहे. हा सामना पाहण्यासाठी एक लाखांहून अधिक प्रेक्षक उपस्थित आहेत. दरम्यान, स्टेडियममध्ये आज असं काही चित्र दिसलं ज्याची आता चर्चा सुरू आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि भारताचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका या दोघीही एकत्र बसून सामन्याचा आनंद घेताना दिसल्या. त्यामुळे चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

२०१९ च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यफेरीत भारताच्या झालेल्या पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अनुष्का शर्मा आणि रितिका सजदेह यांनी एकमेकींना फॉलो करणे बंद केले होते. त्यामुळे काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना बळ मिळत होते. यादरम्यान, आयपीएलच्या सामन्यांदरम्यान या दोघी स्टेडियममध्ये असल्यास वेगवेगळ्या ठिकाणी बसलेल्या दिसायच्या.

दरम्यान, यावर्षी जून महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये अनुष्का आणि रितिका एकत्र बसलेल्या दिसल्या होत्या. दरम्यान, आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील हायहोल्टेज सामन्यातही दोघीजणी एकत्र बसून भारतीय संघाला दिसल्या. या सामन्यात विराट कोहली काही खास करू शकला नाही. तो १६ धावा काढून बाद झाला. मात्र रोहित शर्माने ८६ धावांची झंझावाती खेळी करून भारताचा विजय निश्चित केला. 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानवन डे वर्ल्ड कपअनुष्का शर्मा