Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs PAK : जडेजाचा नेम चुकला आणि रन आऊट होण्याची पुनरावृत्ती टळली

ही गोष्ट घडली ती भुवनेश्वर कुमारच्या ४०व्या षटकात. या षटकातील चौथ्या षटकात मलिकला रन आऊट करण्याची संधी होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 19:55 IST

Open in App
ठळक मुद्देगेल्या सामन्यात केदार जाधवच्या गोलंदाजीवर मलिक रन आऊट झाला होता. या सामन्यातही तशी वेळ त्याच्यावर आली होती.

दुबई, आशिया चषक 2018, भारत विरुद्ध पाकिस्तान : पाकिस्तानचा शोएब मलिक हा एक अनुभवी फलंदाज आहे. पण भारताविरुद्धच्या गेल्या सामन्यात तो रन आऊट झाला होता. या सामन्यातही तशी वेळ आली होती खरी, पण मलिक पुन्हा रन आऊट होता होता वाचला.

गेल्या सामन्यात केदार जाधवच्या गोलंदाजीवर मलिक रन आऊट झाला होता. या सामन्यातही तशी वेळ त्याच्यावर आली होती. यावेळीही त्याच्या समोर होता आसिफ अली.

ही गोष्ट घडली ती भुवनेश्वर कुमारच्या ४०व्या षटकात. या षटकातील चौथ्या षटकात मलिकला रन आऊट करण्याची संधी होती. पण रवींद्र जडेजाने डायरेक्ट हीट केला असता, तर मलिक धावबाद झाला असता. पण जडेजाचा नेम चुकला आणि रन आऊट होण्याची पुनरावृत्ती टळली.

टॅग्स :आशिया चषकभारत विरुद्ध पाकिस्तानरवींद्र जडेजाशोएब मलिक