World Championship of Legends 2025 India Champions vs Pakistan Champions : भारतीय क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत-पाक यांच्यातील महामुकाबला पाहायला मिळणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ च्या दुसऱ्या हंगामातील वेळापत्रक निश्चित झाले आहे. १८ जुलै २०२५ २ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारत-पाक यांच्यासह एकूण ६ संघ सहभागी होणार आहेत. गत हंगामात युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील इंडिया चॅम्पियन्स संघाने पाकिस्तान चॅम्पियन्सला धोबी पछाड देत या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. या दोन्ही संघात पुन्हा एकदा हायहोल्टेज सामना रंगल्याचे पाहायला मिळेल. कधी अन् कुठं रंगणार भारत-पाक यांच्यातील हाय होल्टेज सामना? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कधी अन् कधी रंगणार भारत-पाक यांच्यातील सामना?
इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स या दोन संघातील साखळी फेरीतील लढत २० जुलैला बर्मिंघम येथील एजबेस्टनच्या स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, हा सामना दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल. या सामन्यात युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील संघातून सुरेश रैना, हरभजन सिंग आणि मोहम्मद कैफ हे दिग्गज मैदानात उतरणार आहेत. दुसरीकडे पाकिस्तानच्या ताफ्यात मिस्बाह उल हक, शाहिद आफ्रिदी, मोहम्मद आमिर आणि शोएब मलिक या खेळाडूंचा समावेश आहे.
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
एबी डिव्हिलियर्सची एन्ट्री
यंदाच्या WCL च्या दुसऱ्या हंगामात इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स या दोन संघांशिवाय ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज चॅम्पियन्स हे संघ मैदानात उतरणार आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व हे एबी डिव्हिलियर्सकडे सोपण्यात आले आहे.
भारतीय संघाचे सामने कधी अन् कोणत्या मैदानात रंगणार
- इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स -२० जुलै, एजबेस्टन
- इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स - २२ जुलै नॉर्थेम्पटन
- इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स - २६ जुलै, हेडिंग्ले, लीड्स
- इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध इंग्लंड चॅम्पियन्स -२७ जुलै, हेडिंग्ले, लीड्स
- इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध वेस्टइंडिज चॅम्पियन् - २९ जुलै , लीस्टरशायर