Join us

IND vs PAK : 'भारत-पाकिस्तान मालिकेसाठी राजकारण बाजूला ठेवा'

भारताबरोबरच्या मालिकेसाठी राजकारण बाजूला ठेवावे, असे मत पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 22:07 IST

Open in App
ठळक मुद्देकोणत्या एका व्यक्तीपेक्षा खेळ आमच्यासाठी महत्त्वाचा आहे,' असे मणी यांनी सांगितले.

दुबई, आशिया चषक 2018, भारत विरुद्ध पाकिस्तान : आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा सामना सुरु आहे. या दोन देशांमध्ये मालिकाही सुरु व्हावी, अशी आशा पाकिस्तानला आहे. भारताबरोबरच्या मालिकेसाठी राजकारण बाजूला ठेवावे, असे मत पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी म्हटले आहे.

'सध्या सुरु असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने कोट्यावधी लोकं पाहत आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये मालिकाही खेळवली जावी. यासाठी राजकारण बाजूला ठेवायला हवे. कोणत्या एका व्यक्तीपेक्षा खेळ आमच्यासाठी महत्त्वाचा आहे,' असे मणी यांनी सांगितले.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानआशिया चषक