Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs PAK : पहिल्या बॉलवर षटकार; बुमराहनं लगेच घेतला बदला! सलमानलाही नाही सोडला (VIDEO)

पहिल्या बॉलवर षटकार मारणाऱ्या सईम अयूबचा बुमराहनं दुसऱ्या चेंडूवर काढला वचपा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 21:19 IST

Open in App

IND vs PAK  : भारतीय संघाविरुद्ध फिरकीची जादू दाखवून देणाऱ्या पाकिस्तान संघाला भारतीय संघाने जलदगती आक्रमणासह प्रत्युत्तर दिले. हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा याला शून्यावर माघारी धाडले.  दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहनं आपल्या गोलंदाजीतील जादू दाखवली. या षटकात सईम अयूबनं पहिल्या चेंडूवर षटकार मारला. पण दुसऱ्याच चेंडूवर बुमराहनं त्याचा बदला घेतला.  याच षटकात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगालाही तंबूचा रस्ता दाखवत  पाकिस्तानची अवस्था २ षटकानंतर ३ बाद १३ अशी बिकट केली.

पहिल्याच षटकात दिसली हार्दिक पांड्याची जादू

भारतीय संघाने नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ बाद १७५ धावा करत पाकिस्तानसमोर १७६ धावांचे टार्गेट सेट केले. या धावसंख्येचा बचाव करताना सूर्यकुमार यादवनं पहिल्या षटकाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवली. पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्डसह मिरवणाऱ्या हार्दिक पांड्यानेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत पाकिस्तानची मोठी आस असणाऱ्या साहिबजादा फरहानला चौथ्या चेंडूवर शून्यावर माघारी धाडले. रिंकू सिंहने त्याचा कॅच घेतला. फलंदाजीत पहिल्या चेंडूवर बाद झालेल्या हार्दिक पांड्याने पहिलेच षटक निर्धाव टाकून एक विकेट घेत फलंदाजीतील उणीव गोलंदाजीत भरून काढली. 

मग पिक्चरमध्ये आला बुमराह, षटकार मारणाऱ्या सईम अयूबचा 'करेक्ट कार्यक्रम'

दुसरे षटक घेऊन आलेल्या जसप्रीत बुमराहाच्या पहिल्याच चेंडूवर सईम अयूब याने षटकार मारून खाते उघडले. पण दुसऱ्या चेंडूवर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत बुमराहनं त्याला पायचितच्या रुपात बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. या षटकातील अखेरच्या चेंडूवर सलमान अली आगानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि तोही जसप्रीत बुमराहच्या जाळ्यात अडकला. या दोन षटकात  हा सामना भारतीय संघाकडून सेट झाला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Bumrah's brilliance, Pandya's strike: India dominates Pakistan early in T20 clash.

Web Summary : India's bowlers dominated early against Pakistan. Hardik Pandya struck first, removing Sahibzada. Bumrah dismissed Ayub after a six, then took Salman's wicket. Pakistan struggled at 13/2 after two overs following India setting a target of 176.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध पाकिस्तानजसप्रित बुमराहहार्दिक पांड्या