दुबई, आशिया चषक २०१८ : भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघात होणारा सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा उत्सवच. आशिया चषक स्पर्धेत हे दोन प्रतिस्पर्धी दोनवेळा समोरासमोर आले आणि दोन्ही वेळेला भारताने बाजी मारली. पण या लढतींबरोबरच पाकिस्तानच्या एका ललनेची चर्चाही अधिक रंगली. तिची एक झलक पाहण्यासाठी सोशल मीडियावर तुफान गर्दी झाली. भारतीय फॅन्सना तर तिने घायाळ केले आहे. रविवारी झालेल्या सामन्यात ती युवती पुन्हा दिसली आणि हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या प्रेक्षकांत कॅमेरामन्सनेही तिला अचूक टिपले.
पहिल्या सामन्यात तिला पाहिल्यानंतर काही भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे बीसीसीआयकडे भारत-पाक सामन्यांचे आयोजन करण्याची विनंती केली होती. त्या युवतीच्या सुंदरतेने घायाळ झालेले हे चाहते, तिला पाहण्यासाठी भारत - पाक सामन्यांची मागणी करत होते. या युवतीचे नाव जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली होती आणि इतक्या दिवसाच्या प्रयत्नानंतर तिच्या नावाचा शोध लावण्यात चाहत्यांना यश मिळाले आहे. तिचे नाव नव्या नवोरा असल्याचा दावा करण्यात येत आहे.