IND vs PAK : हार्दिक पांड्यासमोर पाकचा हिरो ठरला झिरो! No Look Wicket चा व्हिडिओ व्हायरल

पांड्याचा स्वॅग! सोशल मीडियावर रंगली 'नो लूक विकेट'ची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 19:44 IST2026-02-16T19:42:03+5:302026-02-16T19:44:51+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs PAK Hardik Pandya No Look Wicket Video Of Sahibzada Farhan Catch Out Video Goes Viral Watch | IND vs PAK : हार्दिक पांड्यासमोर पाकचा हिरो ठरला झिरो! No Look Wicket चा व्हिडिओ व्हायरल

IND vs PAK : हार्दिक पांड्यासमोर पाकचा हिरो ठरला झिरो! No Look Wicket चा व्हिडिओ व्हायरल

IND vs PAK Hardik Pandya No Look Wicket  Viral Vidoe : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा एकतर्फी धुव्वा उडवला. ईशान किशनने फलंदाजीत धमाका दाखवल्यावर हार्दिक पांड्याने फलंदाजीतील फ्लॉप शोची उणीव गोलंदाजीत भरून काढत पाकिस्तान विरुद्धचा सर्वाधिक १७ विकेट्स मिळवण्याचा खास रेकॉर्डचा डाव साधला. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या षटकात पहिली विकेट घेणाऱ्या हार्दिक पांड्यानेच शेवटची विकेट घेत पाकिस्तानचा खेळ ११४ धावांत खल्लास केला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पांड्याचा स्वॅग! सोशल मीडियावर रंगली 'नो लूक विकेट'ची चर्चा

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीत कमाल दाखवताना हार्दिक पांड्याने आपल्या खास अंदाजाने सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे.  क्रिकेटच्या मैदानात हार्दिक पांड्यासह अनेक फलंदाजांनी नो लूक सिक्सरसह मैफिल लुटल्याचे पाहायला मिळाले आहे. पण हार्दिक पांड्याने पाकिस्तानविरुद्ध नो लूक विकेटची झलक चर्चेचा विषय ठरत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर 

पाकचा हिरो पांड्यासमोर ठरला झिरो

भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ईशान किशनच्या ४० चेंडूतील ७७ धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानसमोर १७६ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा बचाव करताना सूर्यकुमार यादवनं पहिले षटक टाकण्याची जबाबदारी ही हार्दिक पांड्याकडे सोपवली. पांड्यानेही पहिल्याच षटकात कमाल दाखवत चौथ्या चेंडूवर पाक सलामीवीर साहिबजादा फरहान याला तंबूचा रस्ता दाखवला. पाकिस्तानच्या हिरो चार चेंडू खेळून खाते न उघडता झेल बाद होऊन परतला. 

India Super 8 Schedule Announced : ठरलं! भारतीय संघ सुपर ८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार पहिला सामना? ...

नेमकं काय घडलं? 

हार्दिक पांड्याने ३ चेंडू निर्धाव टाकत आपल्या पहिल्या षटकाची सुरुवात एकदम दमदार केली. चौथ्या चेंडूवर साहिबजादा फरहान याने मोठा फटका खेळला. हा फटका खेळल्यावरच पांड्याला ही विकेट आपल्या खात्यात जमा झाल्याची खात्री झाली. फलंदाजाने फटका मारल्यावर गोलंदाज चेंडूकडे पाहत कोण कॅचवर येते ते पाहतो. पण पांड्याला माहित होत की,  मिड ऑनला रिंकू सिंह आहे आणि हा कॅच तो पूर्ण करणारच. पांड्याचा हा विश्वास सार्थ ठरला अन् हार्दिक पांड्याला जो विकेटचा आत्मविश्वास होता ती झलक स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाली. हा व्हिडिओ No Look Wicket च्या खास कॅप्शनसह चर्चेचा विषय ठरत आहे.
 

Web Title : IND vs PAK: हार्दिक पांड्या के 'नो लुक विकेट' का वीडियो वायरल।

Web Summary : टी20 वर्ल्ड कप में भारत ने पाकिस्तान को हराया। ईशान किशन के बल्लेबाजी प्रदर्शन के बाद हार्दिक पांड्या का हरफनमौला प्रदर्शन, जिसमें 'नो-लुक विकेट' भी शामिल है, ने सबका ध्यान खींचा। पांड्या ने 17 विकेट लिए और पाकिस्तान की पारी 114 पर समाप्त हो गई।

Web Title : IND vs PAK: Hardik Pandya's 'No Look Wicket' video goes viral.

Web Summary : In the T20 World Cup, India defeated Pakistan. Hardik Pandya's all-around performance, including a 'no-look wicket,' stole the show after Ishan Kishan's batting display. Pandya took 17 wickets, ending Pakistan's innings at 114.