IND vs PAK: भारत-पाक सामन्याची जबरदस्त क्रेझ; जाहिरातींचे दर गगनाला; विमाने आणि हॉटेल्स 'हाऊसफुल्ल'!

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान या महामुकाबल्यासाठी जाहिरात बाजारपेठेत लक्षणीय तेजी आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:17 IST2026-02-14T13:16:26+5:302026-02-14T13:17:54+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Ind vs Pak Fever: Advertise Market Booms as India-Pakistan Clash Drives Airfares and Hotel Prices Up by 50 Percentage | IND vs PAK: भारत-पाक सामन्याची जबरदस्त क्रेझ; जाहिरातींचे दर गगनाला; विमाने आणि हॉटेल्स 'हाऊसफुल्ल'!

IND vs PAK: भारत-पाक सामन्याची जबरदस्त क्रेझ; जाहिरातींचे दर गगनाला; विमाने आणि हॉटेल्स 'हाऊसफुल्ल'!

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मधील सर्वात मोठा थरार रविवारी (१५ फेब्रुवारी २०२६) कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, याचा थेट परिणाम जाहिरात बाजारपेठ आणि पर्यटन क्षेत्रावर झाल्याचे दिसून येत आहे. या एका सामन्याने जाहिरातींच्या दरांपासून ते विमानभाड्यापर्यंत सर्वच विक्रम मोडीत काढले आहेत.

या महामुकाबल्यासाठी जाहिरात बाजारपेठेत लक्षणीय तेजी आली आहे. उद्योग तज्ञांच्या मते, १० सेकंदांच्या टीव्ही जाहिरात स्लॉटची किंमत आता ३० ते ४० लाखांच्या घरात पोहोचली आहे. सामान्यतः हे दर २०-२५ लाख रुपये असतात, मात्र या सामन्यासाठी शेवटच्या क्षणी किमतीत २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, डिजिटल जाहिरांतीसाठी १५-२० लाख (१० सेकंद) रुपये आकरले जात आहेत. ब्रॉडकास्टर जिओस्टारला संपूर्ण स्पर्धेतून २० अब्ज महसूल मिळण्याचा अंदाज आहे. या शर्यतीत एमिरेट्स, अमूल, ओपनएआय, ह्युंदाई, महिंद्रा अँड महिंद्रा आणि ब्रिटानिया यांसारखे दिग्गज ब्रँड्स आघाडीवर आहेत.विशेषतः ऑटोमोबाईल, एफएमसीजीआणि फायनान्स क्षेत्रातील कंपन्यांमध्ये जाहिरातींसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. 

भारत-पाकिस्तान सामन्याच्या जाहिरातींच्या दरांची तुलना सध्या सोन्या-चांदीच्या किमतींशी केली जात आहे. प्रत्येक सेकंदाचा स्लॉट विकला गेला असून हा सामना केवळ खेळाचा नाही, तर जागतिक व्यापाराचा मोठा केंद्रबिंदू ठरला आहे. सामना पाहण्यासाठी भारतातून कोलंबोला जाणाऱ्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, याचा थेट फटका चाहत्यांच्या खिशाला बसत आहे. 

विमानभाडे: इजी माय ट्रीपने दिलेल्या माहितीनुसार, विमान भाड्यात सामान्य दरापेक्षा ४५ ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हॉटेल बुकिंग: क्लिअर ट्रीपनुसार कोलंबोसाठीच्या बुकिंगमध्ये ६५ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर मेक माय ट्रीप ने गेल्या तीन दिवसांत बुकिंग दुप्पट झाल्याचा अहवाल दिला आहे.
प्रीमियम स्टे: कोलंबोमधील फाईव्ह स्टार हॉटेल्सचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले असून, सामन्याच्या पार्श्वभूमीवर बहुतांश प्रमुख हॉटेल्स आताच हाऊसफुल्ल झाली आहेत.

Web Title : भारत-पाक मैच के क्रेज से विज्ञापन दरें आसमान पर; उड़ानें, होटल हाउसफुल!

Web Summary : भारत-पाकिस्तान मैच के उत्साह से विज्ञापन दरें 40 लाख रुपये प्रति 10 सेकंड तक पहुंच गईं। कोलंबो के लिए उड़ानें और होटल महंगे हो गए हैं और आगामी मैच की उच्च मांग के कारण लगभग पूरी तरह से बुक हो चुके हैं।

Web Title : India-Pakistan match craze skyrockets ad rates; flights, hotels fully booked!

Web Summary : India-Pakistan match excitement boosts ad rates to ₹40 lakh per 10 seconds. Flights and hotels to Colombo see huge price hikes and are nearly sold out due to high demand for the upcoming match.