IND vs PAK : ... धोनी मैदानात पडला आणि 'त्या' तरुणीच्या काळजाचा ठोका चुकला

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या चौथ्या षटकात धोनी एक चेंडू पकडताना चक्क जमिनीवर पडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 17:26 IST2018-09-23T17:25:58+5:302018-09-23T17:26:34+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs PAK: ... Dhoni fell into the ground | IND vs PAK : ... धोनी मैदानात पडला आणि 'त्या' तरुणीच्या काळजाचा ठोका चुकला

IND vs PAK : ... धोनी मैदानात पडला आणि 'त्या' तरुणीच्या काळजाचा ठोका चुकला

ठळक मुद्देधोनी जेव्हा पडला तेव्हा मैदानातील एका तरुणीच्या काळजाचा ठोका चुकला. धोनीला नेमके काय झाले, हे तिला कळत नव्हते.

दुबई, आशिया चषक 2018, भारत विरुद्ध पाकिस्तान : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे बरेच चाहते आहेत. या गोष्टीचा प्रत्यय भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आला.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्यात धोनी यष्टीरक्षण करत होता. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या चौथ्या षटकात धोनी एक चेंडू पकडताना चक्क जमिनीवर पडला.

धोनी जमिनीवर पडला असला तरी त्याने चेंडू मात्र सोडला नाही. पण धोनी जेव्हा पडला तेव्हा मैदानातील एका तरुणीच्या काळजाचा ठोका चुकला. धोनीला नेमके काय झाले, हे तिला कळत नव्हते. पण त्यानंतर धोनी जेव्हा हसत हसत उठला तेव्हा तिच्या जीवात जीव आला.

Web Title: IND vs PAK: ... Dhoni fell into the ground