Join us

Ind vs Pak: सुंदरा मनामध्ये भरली... पाकिस्तानच्या 'या' ललनेनं भारतीय तरुणाईला केलं घायाळ

एखादा सुंदर चेहरा नजरेस पडतो. तो न्याहाळावा. आयुष्यभर हा चेहरा पाहत बसावा, अशा कल्पना मनात रुंजी घालतात. कारण तो सुंदर, लोभस, सतेज चेहरा त्यावेळी आपल्या हृदयाच्या सिंहासनावर विराजमान झालेला असतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 15:26 IST

Open in App
ठळक मुद्देदुबईच्या स्टेडियममध्ये त्या तरुणीने भारतीयांना प्रेमात पाडलं होतं. चाहत्यांनी या तरुणीसाठी बीसीसीआयकडे काही मागण्या केल्या आहेत.

दुबई, आशिया चषक 2018 : एखादा सुंदर चेहरा नजरेस पडतो. तो न्याहाळावा. आयुष्यभर हा चेहरा पाहत बसावा, अशा कल्पना मनात रुंजी घालतात. कारण तो सुंदर, लोभस, सतेज चेहरा त्यावेळी आपल्या हृदयाच्या सिंहासनावर विराजमान झालेला असतो. असंच काही भारतीय चाहत्यांबाबत घडलं आणि तेही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात. कारण त्या तरुणीने आपल्या सुंदर चेहऱ्यामुळे भारतीयांना देशाची सीमा, पाकिस्ताबरोबर असलेलं शत्रूत्त्व आणि सुरु असेलला उत्कंठावर्धक सामना हे सारं काही विसरायला लावलं.

भारत आणि पाकिस्तान यांचा सामना पाहण्यासाठी क्रिकेट विश्व आतूर असतो. पण बुधवारी झालेल्या सामन्यात मात्र भारतीयांना रस नव्हता, असं तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण असं घडलं. याला कारण ठरली ती पाकिस्तानची एक सुंदर तरूणी. आपल्या अदांनी तिने भारताच्या चाहत्यांना घायाळ केलं.

 तिला भारतीय चाहत्यांनी पाहिलं आणि ते तिला पाहतंच राहीले. त्यांच्या मनावर, हृदयावर तिनंच अधिराज्य गाजवलं. तिला पाहिल्यावर सामना पाहण्यात भारतीयांना रस नव्हता. कारण सामना भारत जिंकणार हे निश्चित झालं होतं. दुबईच्या स्टेडियममध्ये त्या तरुणीने भारतीयांना प्रेमात पाडलं होतं. चाहत्यांनी या तरुणीसाठी बीसीसीआयकडे काही मागण्या केल्या आहेत. भारत-पाकिस्तान सामने ठेवा, आयपीएलमध्ये पाकिस्तानलाही प्रवेश द्या अशा मागण्या ट्विटरवर चाहते करत आहेत.

चाहत्यांनी तरुणीला पाहून केले हे काही ट्विट

टॅग्स :आशिया चषकभारत विरुद्ध पाकिस्तानव्हायरल फोटोज्