IND vs PAK, Asia Cup 2025 : आशिया चषक स्पर्धेत यूएईविरुद्ध टीम इंडियाचा सुपरफास्ट विजय झाला. आता आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानचा भारताशी १४ सप्टेंबरला सामना होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल एक मोठा संकेत मिळाला आहे, ज्यामुळे संघात कोणते खेळाडू असतील हे स्पष्ट होते. पाकिस्तानविरुद्ध भारताच्या खेळण्याबद्दल मिळालेल्या संकेतांनुसार, संघात ५ फलंदाज, ३ अष्टपैलू खेळाडू आणि ३ गोलंदाजांसाठी जागा असल्याचे दिसते.
पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची प्लेइंग ११ मध्ये कोण-कोण असतील? याबद्दल माजी क्रिकेटर आणि क्रिकेटतज्ज्ञ अजय जाडेजाने सांगितले. माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जाडेजाच्या मते, पाकिस्तान विरुद्धही भारत तोच संघ खेळवताना दिसेल, जो युएईविरुद्ध खेळला होता. म्हणजेच संघात कोणताही बदल होणार नाही. युएईविरुद्ध जो संघ खेळेल, तोच संघ पाकविरोधात खेळेल, असे अजय जाडेजाने भारताचा पहिला सामना सुरू होण्यापूर्वीच स्पष्टपणे सांगितले होते.
भारताच्या यूएई विरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनवर चर्चा करताना अजय जडेजा म्हणाला होती की, भारताने यूएई विरुद्ध ८ फलंदाज खेळवायला नको होते. पण त्यांनी तसे केले आहे तर त्याचा अर्थ आज पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याची रंगीत तालीम पाहत आहोत. त्यामुळे जाडेजाच्या मते, भारतीय संघ पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात एकही बदल करणार नाही.
भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन- अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
Web Title: Ind vs Pak Asia Cup 2025 Team India will play with same Playing XI against pakistan in next game said former cricketer ajay jadeja
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.