Join us

"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

Shaheen Shah Afridi on Harris Rauf, IND vs PAK Asia Cup 2025: हॅरिस रौफने मैदानात भारतीयांना डिवचण्यासाठी एक कृती केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 19:00 IST

Open in App

Shaheen Shah Afridi on Harris Rauf, IND vs PAK Asia Cup 2025: भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला सलग दुसऱ्यांदा पराभूत केले. सुपर-४ फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानवर ६ गडी राखून सहज विजय मिळवला. सलामीवीर साहिबझादा फरहान याच्या ५८ धावा आणि इतर फलंदाजांच्या छोटेखानी खेळी यांच्या बळावर पाकिस्तानने भारताला १७२ धावांचे आव्हान दिले होते. पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर अभिषेक शर्माच्या धडाकेबाज ७४ धावांच्या खेळीपुढे पाकिस्तानी गोलंदाजांचा जराही निभाव लागला नाही. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांसह फिरकीपटूंचीही अभिषेक शर्माने तुफान धुलाई केली. टीम इंडियातील खेळाडूंच्या कामगिरीचे पाकिस्तानातूनही कौतुक होत आहे. पण त्या सामन्यातील आणखी एका गोष्टीचीही चर्चा रंगली, ते म्हणजे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ याने मैदानात केलेली कृती.

हॅरिस रौफ आणि पाकिस्तानी खेळा़डू यांनी भारतीय क्रिकेटपटूंना मैदानात डिवचण्याचा प्रयत्न केला. हॅरिस रौफने तर भारतीय चाहत्यांनाही डिवचण्याचा प्रयत्न केला. तो सीमारेषेवर उभा असताना त्याला काही भारतीय चाहत्यांनी विराट कोहली आठवतो का, असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्याने हाताने मिसाईल उडण्याचा आणि खाली पडण्याचा इशारा केला. पाकिस्तानने युद्धाच्या वेळी खोटा दावा केली होता की, भारताची मिसाईल्स पाकिस्तानने पाडली. त्यावरून हे हावभाव होते. त्यावर बरीच टीका झाली. पण पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी याने मात्र त्याची पाठराखण केली.

"आम्ही मैदानात उतरतो तेव्हा आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी येतो. आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो की आम्ही चांगला खेळ करू. मैदानात प्रत्येकाला आपापल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला स्वाभिमान असतो. एखादा माणूस कसा विचार करेल हे आपल्या हातात नसते. आमचे काम क्रिकेट खेळणे इतके असते. आम्ही तिरंगी मालिका जिंकलो, आता आशिया कप जिंकण्याचा प्रयत्न करतो आहे. आमचे खेळाडू शक्य ते प्रयत्न करत आहेत. पण मैदानात प्रत्येकाला जे हवे ते करायचे स्वातंत्र्य आहे," अशा शब्दांत आफ्रिदीने हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन केले.

टॅग्स :आशिया कप २०२५भारत विरुद्ध पाकिस्तानपाकिस्तानव्हायरल व्हिडिओ