IND vs PAK Asia Cup 2025: आशिया कप २०२५च्या सुपर-४ सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवले. आशिया कपमध्ये पाकिस्तानवर हा त्यांचा सलग दुसरा विजय होता. पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहानचा AK-47 सेलिब्रेशन (बंदुकीचा सेलिब्रेशन) आणि त्यानंतर भारतीय फलंदाजांनी केलेल्या प्रत्युत्तराच्या कृतीची सर्वत्र चर्चा झाली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने १७१ धावा केल्या. साहिबजादा फरहानने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर त्याच्या बॅटने AK-47 गोळीबार करण्याचा इशारा केला. प्रत्युत्तरात, भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलने पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली. पॉवरप्लेमध्ये ७० धावा जोडून या जोडीने सामना भारताच्या बाजूने वळवला. अभिषेकच्या बॅटने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली, ज्याचे वर्णन पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने 'ब्रह्मास्त्र' असे केले.
पाकिस्तानचा माजी लेग-स्पिनर दानिश कनेरियाने सामन्यानंतर पाकिस्तानी संघावर टीका करताना आपल्या यूट्युब चॅनेलवर म्हटले की, जागतिक दर्जाचे खेळाडू त्यांच्या बॅटने प्रतिसाद देतात, हावभावांनी नाही. भारत मैदानावर कृतीने प्रतिसाद देत होता, तर पाकिस्तानी खेळाडू सेलिब्रेशनमध्ये व्यस्त राहिले. फरहानने एके-४७ चालवण्याचा इशारा केला, त्यानंतर अभिषेक आणि शुभमन गिल 'ब्रह्मास्त्र' चालवून सामना जिंकवला. अभिषेक शर्माच्या खेळात युवराज सिंगची झलक दिसून आली. त्याने शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. तो हुशारीने क्रिकेट खेळला आणि गोलंदाजापेक्षा एक पाऊल पुढे राहून फटकेबाजी केली.
दानिशने पाकिस्तानी संघाची सुधारणा झाल्याचेही मान्य केले. तो म्हणाला की, पाकिस्तानी संघ भारताविरुद्धच्या मागील सामन्यापेक्षा चांगला खेळला, कारण पहिला गट सामना पूर्णपणे एकतर्फी होता. परंतु त्यांनी या सामन्यात चांगली फलंदाजी केली. साहिबजादा फरहानमुळे पाकिस्तानने भारतासमोर १७१ धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्तानी संघ १९०-२०० धावा करू शकला असता. परंतु नंतर सूर्यकुमार यादवने शिवम दुबेला चेंडू दिला आणि त्याने महत्त्वाची विकेट घेत धावांचा ओघ थांबवला. तेथूनच पाकिस्तानचा मागे पडत गेला आणि सामना भारताने जिंकला.
Web Title: ind vs pak asia cup 2025 former pakistan cricketer danish kaneria slams farhan ak47 celebration praises abhishek sharma shubman gill brahmastra counter attack
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.