IND vs PAK : भारताच्या फटकेबाजीनंतर परवेझ मुशर्रफ यांनी स्टेडियममधून काढता पाय घेतला

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी दमदार सलामी द्यायला सुरुवात केली. त्यावेळीच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनी काढता पाय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 22:33 IST2018-09-23T22:29:18+5:302018-09-23T22:33:01+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs PAK: After the bursting of India, Pervez Musharraf stepped out of the stadium | IND vs PAK : भारताच्या फटकेबाजीनंतर परवेझ मुशर्रफ यांनी स्टेडियममधून काढता पाय घेतला

IND vs PAK : भारताच्या फटकेबाजीनंतर परवेझ मुशर्रफ यांनी स्टेडियममधून काढता पाय घेतला

ठळक मुद्देभारताची दमदार सलामी पाहून मुशर्रफ यांनी स्टेडियम सोडण्याचा निर्णय घेतला.

दुबई, आशिया चषक 2018, भारत विरुद्ध पाकिस्तान : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा दुसरा डाव सुरु झाला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी दमदार सलामी द्यायला सुरुवात केली. त्यावेळीच पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी काढता पाय घेतला.

शोएब मलिकच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांमध्ये 237 धावा करता आल्या. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मलिकने 90 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 78 धावांची खेळी केली.

पाकिस्तानच्या २३८ धावांचा पाठलाग करताना रोहित आणि धवन यांनी फटकेबाजी करत १० षटकांत अर्धशतक झळकावले. भारताची दमदार सलामी पाहून मुशर्रफ यांनी स्टेडियम सोडण्याचा निर्णय घेतला.


Web Title: IND vs PAK: After the bursting of India, Pervez Musharraf stepped out of the stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.