Join us

IND vs NZ : विराट कोहलीने केली गोलंदाजांची प्रशंसा

बुमराह, शमी, शार्दुल आणि शिवम यांनीही धावा रोखणारे चेंडू टाकले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 06:44 IST

Open in App

आॅकलंड : भारताचा कर्णधार विराट कोहली याने दुसऱ्या टी-२० त न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव केल्यानंतर नियंत्रित मारा करणा-या भारतीय गोलंदाजांची प्रशंसा केली.

विराट म्हणाला, ‘माझ्या मते, आज आम्ही दमदार कामगिरी केली. गोलंदाजांनी सामन्यात वर्चस्व गाजवले. लक्ष्य लहान असल्याने आम्ही त्यानुसार फलंदाजी केली. १६० धावांचे लक्ष्य मिळाले असते तरी आम्ही सरशी साधू शकलो असतो.’ या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत होती, असे सांगून कोहलीने जडेजाच्या मा-याचे कौतुक केले.

बुमराह, शमी, शार्दुल आणि शिवम यांनीही धावा रोखणारे चेंडू टाकले. न्यूझीलंड संघाने मधल्या षटकांमध्ये आमच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला होता, तरीही राहुल आणि अय्यरच्या बेधडक फटकेबाजीच्या बळावर विजय मिळविण्यात यशस्वी ठरलो, असे कोहलीने सांगितले.(वृत्तसंस्था)विराटने टाकले रोहितला मागेशार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर विराटने मार्टिन गुप्तीलचा सुरेख झेल पकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाºया भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. सर्वाधिक झेल घेणाºया भारतीय खेळाडूंमध्ये सुरेश रैना ४२, विराट कोहली ४१ आणि रोहित शर्मा ४० यांचा समावेश आहे.

टॅग्स :विराट कोहली