Join us

Video : वर्ल्ड कपमधील पराभवाचा वचपा काढणार का? विराट कोहलीचं मन जिंकणारं उत्तर

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना शुक्रवारी होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 14:22 IST

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना शुक्रवारी होत आहे. शिखर धवननं दुखापतीमुळे माघार घेतल्यानं टीम इंडिया या सामन्या लोकेश राहुल व रोहित शर्मा या सलामीच्या जोडीसह मैदानावर उतरणार आहे. कर्णधार विराट कोहलीनंही या सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत संघाची रणनीती स्पष्ट केली. याचवेळी त्याला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कोहलीनं दिलेलं उत्तर अनेकांची मनं जिंकून घेणारं ठरलं.

IND Vs NZ : रिषभ पंत की लोकेश राहुल? पहिल्या सामन्यात अशी असेल टीम इंडिया, विराटचे संकेत

टीम इंडियाला इंग्लंडमध्ये गतवर्षी झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. न्यूझीलंडच्या 8 बाद 239 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा संपूर्ण संघ 49.3 षटकांत 221 धावांत तंबूत परतला होता. त्यामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं होतं. त्यानंतर टीम इंडिया प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा सामना करणार आहे. त्या पराभवाची सव्याज परतफेड करण्याची संधी टीम इंडियाला आहे, परंतु कोहलीच्या मनात काहीतरी दुसरेच सुरू आहे.

तो म्हणाला,''वचपा काढण्याचा विचारही डोक्यात नाही. हा प्रतिस्पर्धीच असा आहे की तुमच्या डोक्यात असा विचारच येऊ शकत नाही. मैदानावर स्पर्धात्मक खेळ करणे एवढेच महत्त्वाचे आहे. उत्कृष्ट संघ कसा असावा याची प्रचिती न्यूझीलंड संघाकडे पाहिल्यावर येते. वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांनी प्रवेश केला, याचा आम्हाला आनंदच झाला होता. त्यामुळे पराभवाची परतफेड वगैरै करण्याचे लक्ष्य नाही.''

पाहा व्हिडीओ..

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीवर्ल्ड कप 2019