Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ : विराट आणि अनुष्का न्यूझीलंडमध्ये एकत्र दिसले अन्...

विराट आणि अनुष्का जेव्हा आपल्या सामानासह विामानतळाबाहेर आले तेव्हा चाहत्यांनी त्यांना चीअर केले. पण विराट आणि अनुष्का यांनी मात्र चाहत्यांचा हिरमोड केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 15:29 IST

Open in App

ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघ आज ऑकलंडच्या विमानतळावर न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी पोहोचला. यावेळी संघातील खेळाडू विमानतळावरून बाहेर येत असताना चाहत्यांनी त्यांना चांगलाच पाठिंबा दिला. प्रत्येक खेळाडू आपल्या सामानाबरोबर बाहेर येत होते. पण विराट मात्र पत्नी अनुष्का शर्माबरोबर आला आणि चाहत्यांनी एक वेगळीच रीअॅक्शन दिली.

भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. या दौऱ्याला 23 जानेवारीला पहिल्या एकदिवसीय सामन्याने सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी भारताच्या एकाही खेळाडूची पत्नी नव्हती, पण कोहली आपल्या पत्नीबरोबर आल्यावर चाहत्यांनी एकच कल्ला केला. काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्का यांनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्यावेळी दिग्गज रॉजर फेडररची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्या तिघांचा एक फोटो सोशल मीडियावर आला आणि विराट व अनुष्का यावेळी चांगलेच ट्रोल झाले होते.

हा पाहा खास व्हिडीओ

विराट आणि अनुष्का जेव्हा आपल्या सामानासह विामानतळाबाहेर आले तेव्हा चाहत्यांनी त्यांना चीअर केले. पण विराट आणि अनुष्का यांनी मात्र चाहत्यांचा हिरमोड केला. चाहत्यांना या दोघांच्या स्वाक्षरा घ्यायच्या होत्या. पण या दोघांनीही चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली नाही.

भारतीय संघ :विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रिसिंग धोनी, अंबाती रायुडू, केदार जाधव, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, विजय शंकर, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, युजवेद्र चहल, खलील और शुभमन गिल.

 
टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माभारत विरुद्ध न्यूझीलंड