Join us

IND vs NZ : न्यूझीलंड दौऱ्यासाठी गब्बर घेतोय खास मेहनत, पाहा हा व्हिडीओ

न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी सर्वांचा लाडका हा गब्बर खास मेहनत घेत आहे. आपल्या इंस्टाग्रामवर त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 21:01 IST

Open in App

ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताचा सलामीवीर शिखर धवनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे आता न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी सर्वांचा लाडका हा गब्बर खास मेहनत घेत आहे. आपल्या इंस्टाग्रामवर त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

भारताचा संघ आज न्यूझीलंडमध्ये दाखल झाला. यावेळी भारतीय संघातील काही खेळाडूंनी थोडी विश्रांती घेतल्यावर थेट व्यायामशाळा गाठली. यामध्ये गब्बरचाही समावेश होता. व्यायामशाळेमध्ये जाऊन गब्बरने चांगलाच घाम गाळला. गब्बर व्यायाम करत असताना केदार जाधव आणि युजवेंद्र चहल हे त्याच्यामागे डान्स करत असल्याचेही पाहायला मिळाले. 

पाहा हा व्हिडीओ

टॅग्स :शिखर धवनभारत विरुद्ध न्यूझीलंड