IND Vs NZ: विराटच्या शतकाचं अर्धशतक! सौरव गांगुलीनं किंग कोहलीच्या करिअरसंदर्भात केला मोठा दावा

रोहित शर्मा असो, शुभमन गिल असो, श्रेयस अय्यर असो अथवा गोलंदाज. हा एक परिपूर्ण संघ आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 10:17 PM2023-11-15T22:17:58+5:302023-11-15T22:18:47+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ Semi Final 2023 sourav ganguly reaction after virat kohli historic century at wankhede stadium | IND Vs NZ: विराटच्या शतकाचं अर्धशतक! सौरव गांगुलीनं किंग कोहलीच्या करिअरसंदर्भात केला मोठा दावा

IND Vs NZ: विराटच्या शतकाचं अर्धशतक! सौरव गांगुलीनं किंग कोहलीच्या करिअरसंदर्भात केला मोठा दावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या विश्वचषक-2023 च्या उपांत्य फेरीत, विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांतील 50 वे शतक झककावत इतिहास रचला. या विक्रमी खेळी बरोबरच क्रिकेटचा देव म्हणवल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला मागे सोडत, आता तो एकदिवसीय क्रेकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू बनला आहे. कोहलीच्या या विराट खेळीनंतर, आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची प्रतिक्रिया आली आहे.  

ईडन गार्डन्समध्ये पत्रकारांसोबत बोलताना गांगुली म्हणाला, हा खेळाडू (विराट कोहली) आपल्या कारकिर्दीत आणखी अनेक विक्रम करेल, यात शंका नाही. कोहलीच्या या विक्रमापर्यंत पोहचण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागतील. त्याची कारकीर्द अद्याप संपलेली नाही. ही एक उत्कृष्ट कामगिरी आहे." 

यावेळी गांगुलीने आक्रामक क्रिकेट खेण्यासाठी भारतीय संघाचे कौतुकही केली. तो म्हणाला, ‘‘सध्या भारत अविश्वसनीय क्रिकेट खेळत आहे. मग तो रोहित शर्मा असो, शुभमन गिल असो, श्रेयस अय्यर असो अथवा गोलंदाज. हा एक परिपूर्ण संघ आहे. या संघात जबरदस्त प्रतिभा आहे. मात्र आपण एका वेळी एका सामन्यासंदर्भातच विचार करणे आवश्यक आहे.’

गांगुली पुढे म्हणाला, ‘‘तो ज्या खेळपट्टीवर खेळत आहे, ती चांगली खेळपट्टी आहे. ती दोन्ही संघांसाठी सारखीच आहे. वानखेडेच्या खेळपट्टीत काहीही चुकीचे नाही.’’
 

Web Title: IND vs NZ Semi Final 2023 sourav ganguly reaction after virat kohli historic century at wankhede stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.