Join us

Ind Vs NZ : Sanju Samson ठरला सुपरमॅन; हवेतल्या हवेत वाचवल्या चार धावा

ही गोष्ट घडली ती आठव्या षटकात. भारताकडून आठवे षटक वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर टाकत होता. शार्दुलच्या या चेंडूवर रॉस टेलरने जोरदार फटका लगावला. हा फटका आता षटकार जाणार असे वाटत होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 15:15 IST

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताचा युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या सामन्यात सुपरमॅनसारखी उडी मारली आणि संघासाठी चार धावा वाचवल्याचे पाहायला मिळाले.

ही गोष्ट घडली ती आठव्या षटकात. भारताकडून आठवे षटक वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर टाकत होता. शार्दुलच्या या चेंडूवर रॉस टेलरने जोरदार फटका लगावला. हा फटका आता षटकार जाणार असे वाटत होते. पण संजूने चेंडू झेलला आणि हवेतूनच सीमारेषेच्या आतमध्ये टाकला.

कर्णधार रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताला न्यूझीलंडपुढे १६४ धावांचे आव्हान ठेवता आले.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाहुण्यांनी नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हंगामी कर्णधार रोहितने यावेळी संघाच्या क्रमवारीत बदल केला. युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला सलामीला पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला. पण संजूला या संधीचा फायदा उठवता आला नाही आणि २ धावा करून तो बाद झाला.

संजू स्वस्तात बाद झाला असला तरी त्यानंतर रोहित आणि लोकेश राहुल यांनी संघाला डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचली. पण मोठा फटका मारण्याचा नादात तो बाद झाला. पण राहुल बाद झाला असला तरी रोहितने एका बाजूने जोरदार फटकेबाजी केली. रोहितच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

न्यूझीलंडच्या खेळाडूने मैदानात येतात लिहिला इतिहास, केला मोठा पराक्रमभारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरचा ट्वेन्टी-२० सामना सुरु झाल्यावर लगेचच एक मोठी गोष्ट पाहायला मिळाली. मैदानात पाय ठेवताच न्यूझीलंडच्या एका खेळाडूने इतिहास रचला आहे. न्यूझीलंडच्या या खेळाडूने पराक्रम केला असून तो देशाचा अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंड