Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता हिटमॅन रोहित शर्माच्या रडारवर पाकिस्तानी स्फोटक बॅटर शाहिद आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड

शाहिद आफ्रिदीच्या नावे षटकारांचं अर्धशतक. त्याला मागे टाकण्यासाठी हिटमॅनला आणखी किती षटकारांची गरज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 13:01 IST

Open in App

IND vs NZ Rohit Sharma Will Break Shahid Afridi World Record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात हिटमॅन रोहित शर्माची बॅट काही तळपली नाही. आता तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात तो दोन्ही डावातील कसर भरून काढेल, अशी अपेक्षा आहे. एवढेच नाही तर या सामन्यात त्याला पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदीचा मोठा विक्रम मोडण्याची संधी देखील असेल, इथं जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

हिटमॅन रोहितच्या निशाण्यावर पाकच्या आफ्रिदीचा विक्रम

भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि तीन सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना इंदूर येथील होळकर स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत सर्वाधिक षटकारांचा नवा विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे. सध्याच्या घडीला हा विक्रम पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीच्या नावे आहे. 

विराट-अनुष्का जोडीची अलिबागमध्ये ५ एकर जमिनीची खरेदी; किती कोटींमध्ये झाला व्यवहार?

शाहिद आफ्रिदीच्या नावे षटकारांचं अर्धशतक

रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिका गाजवल्यावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीतील धमक दाखवली होती. पण न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात २६ आणि दुसऱ्या सामन्यात २४ धावांवरच तो अडखळला. या छोट्याखानी धावसंख्या करतानाही आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५० षटकार मारण्याचा मोठा डाव त्याने साधला होता. आता आणखी एक विक्रम त्याला खुणावत आहे.

हिटमॅन रोहित शर्माचा सिक्सरचा रेकॉर्ड

रोहित शर्मानं आतापर्यंत २८१ वनडे सामन्यात ११५६६ धावा केल्या असून यात त्याने ३३ष शतकांसह ६१ अर्धशतके झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५० हून अधिक षटकार मारणाऱ्या रोहितनं  फक्त  वनडेत ३५७ षटकारमारले आहेत. याशिवाय कसोटीत त्याच्या नावे ८८ तर टी-२० मध्ये ३०२ षटकारांची  नोंद आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Sharma eyes Shahid Afridi's six-hitting world record.

Web Summary : Rohit Sharma aims to surpass Shahid Afridi's record for most sixes in ODIs against New Zealand in the upcoming match at Holkar Stadium, Indore. Sharma currently has 357 ODI sixes.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माशाहिद अफ्रिदी