Join us
Daily Top 2Weekly Top 5

आधी अभिषेकचं वादळ! मग रिंकूचा कडक फिनिशिंग टच! न्यूझीलंडसमोर टीम इंडियानं उभारली विक्रमी धावसंख्या

आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 20:54 IST

Open in App

India vs New Zealand, 1st T20I : सलामीवीर अभिषेक शर्माच्या धमाकेदार शोनंतर रिंकू सिंहच्या कडक फिनिशिंग टचच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडसमोर विक्रमी धावसंख्या उभारली आहे. नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. नागपूरच्या मैदानात नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन १० (७) आणि इशान किशन ८ (५) स्वस्तात माघारी फिरले. पण त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा जोडी जमली. या दोघांच्या दमदार भागीदारीनंतर अखेरच्या षटकात रिंकू सिंहनं आपला जलवा दाखला. त्याच्या कडक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात २३८ धावा करत न्यूझीलंडसमोर ३३९ धावांचे आव्हान ठेवले आहे.  आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सलामीवीर अभिषेक शर्मानं  ३५ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह २४० च्या स्ट्राइक रेटनं ८४ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवनं २२ चेंडूत ३२ धावांची उपयुक्त खेळी करत त्याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची दमदार भागीदारी रचली. हार्दिक पांड्या १६ चेंडूत २५ धावा करून परतल्यावर रिंकू सिंह पिक्चरमध्ये आला. त्याने २० चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २२० च्या स्ट्राइक रेटनं  नाबाद ४४ धावा करत संघाच्या धावफलकावर ७ बाद २३८ धावा लावल्या. 

Abhishek Sharma New Record : षटकारांची आतषबाजी! अभिषेक शर्मानं मोडला गुरु युवराज सिंगचा रेकॉर्ड

न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मध्ये भारतीय संघाने उभारलेली ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. याआधी ऑस्ट्रेलियाने २०१८ मध्ये २४५ तर २०१९ मध्ये इंग्लंडच्या संघाने २४१ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. न्यूझीलंडचा संघ क्रिकेट जगतातील एक सर्वोत्तम संघ आहे. पण टी-२० क्रिकेटमध्ये २०० पारची लढाई फक्त त्यांनी एकदाच जिंकली आहे.  २०१२ मध्ये त्यांनी झिम्बाब्वे विरुद्ध घरच्या मैदानात २०१ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.  त्यानंतर एकदाही त्यांनी २०० पारची लढाई जिंकलेली नाही. त्यामुळे न्यूझीलंडसमोर टी-२० तील सर्वोच्च धावसंख्या उभारत टीम इंडियाने निम्मी लढाई जिंकली आहे. 

 न्यूझीलंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या

  • २४५/५ – ऑस्ट्रेलिया, ऑकलंड (२०१८)
  • २४१/३ – इंग्लंड, नेपियर (२०१९)
  • २३८/७ – नागपूर (२०२६)*
  • २३६/४ – इंग्लंड, क्राइस्टचर्च (२०२५)
English
हिंदी सारांश
Web Title : Abhishek's storm, Rinku's finish: India posts record score against New Zealand.

Web Summary : Abhishek Sharma's blistering start and Rinku Singh's powerful finish propelled India to a record-breaking 238/7 against New Zealand in the first T20. This is India's highest T20I score against the Kiwis.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडअभिषेक शर्मारिंकू सिंग