Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली सांगतोय गेल्या वर्षातील आपला आवडता क्षण, पाहा हा व्हिडीओ

गेल्या वर्षातला आवडता क्षण कोणता? असा प्रश्न भारताचा कर्णधार विराट कोहलीला विचारला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 17:31 IST

Open in App

नेपीयर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघ सध्याच्या घडीला न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. या वर्षाची सुरुवात भारताने झोकात केली आहे. पण गेल्या वर्षात भारताच्या पदरी काही विजय, तर पराभव पडले होते. गेल्या वर्षी बऱ्याच घटनाही घडल्या. त्यामुळे गेल्या वर्षातला आवडता क्षण कोणता? असा प्रश्न भारताचा कर्णधार विराट कोहलीला विचारला गेला. त्याने या प्रश्नावर दिलेले उत्तर तुम्हाला एका खास व्हिडीच्या माध्यमातून पाहता येईल.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ किवींच्या देशात पाच वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे. बुधवारपासून दोन देशांमधील वन डे मालिकेला सुरुवात होणार असून आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे. हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्या अनुपस्थितीत कोहली कोणत्या शिलेदारांसह मैदानात उतरेल हे पाहणे उत्सुकतेचे आहे. पांड्या व राहुल यांच्या जागी संघात विजय शंकर व शुभमन गिल यांचा समावेश करण्यात आला आहे, परंतु त्यांना संधी मिळेलच असे नाही.

गेल्या वर्षातील आवडत्या क्षणाबद्दल कोहली म्हणाला की, " ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत अॅडलेड येथे मिळवलेला विजय माझ्यासाठी अविस्मरणीय असाच आहे. त्याचबरोबर मेलबर्नवरील विजयही मला मोलाचा वाटतो. " 

हा पाहा खास व्हिडीओ

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध न्यूझीलंड