Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘Launda from dilli’; अनुष्का शर्माच्या कमेंटवर विराट कोहलीचं उत्तर, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

भारताच्या कसोटी व वन डे संघाचा कर्णधार विराट कोहली यानं न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 12:46 IST

Open in App

भारताच्या कसोटी व वन डे संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत खेळणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विश्रांती घेतलेल्या कोहलीनं मुंबईच्या BKC Ground वर सरावाला सुरूवात केली आहे. पण, यावेळी विराट एका मांजरीसोबतही खेळताना दिसला आणि त्यानं ते फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले विराटनं लिहिलं की,''सराव सत्रात आलेल्या मांजरीला हॅलो म्हणा.'' त्याच्या या पोस्टवर अनुष्का शर्मानं लगेच रिप्लाय देताना हॅलो बिल्ली अशी कमेंट केली. त्यावर विराटनं पुन्हा उत्तर दिले आणि लिहिलं,''लौंडा फ्रॉम दिल्ली ( दिल्लीचा मुलगा) आणि मुंबई की बिल्ली ( मुंबईची मांजर)''

 जाणून घेऊया कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी - २५ ते २९ नोव्हेंबर, कानपूरदुसरी कसोटी - ३ ते ७ डिसेंबर, मुंबईवेळ - सकाळी ९.३० वाजल्यापासून 

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ - अजिंक्य रहाणे ( कर्णधार), चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धीमान सहा, केएस भरत, रविंद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद  सिराज, प्रसिद्ध कृष्णा  

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ - विराट कोहली ( कर्णधार), अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धीमान सहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा 

न्यूझीलंडचा कसोटी संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, ग्लेन फिलिप्स, राचिन रविंद्र, मिचेल सँटनर, विल सोमरविल, टीम साऊदी, रॉस टेलर, विल यंग, निल वॅगनर  

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माभारत विरुद्ध न्यूझीलंड
Open in App