IND vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या वनडे संघात रिषभ पंतकडे कानाडोळा करत लोकेश राहुलला पहिली पंसती देण्यात आलीये. मिनी वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या दोन्ही सामन्यात लोकेश राहुलच प्लेइंग इलेव्हनचा भाग दिसला. न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीत हाच प्रयोग कायम राहणार की, संघात बाकावर बसलेल्या रिषभ पंतसह अन्य खेळाडूंना संधी मिळणार याची चर्चा रंगू लागली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
KL राहुलनं रिषभ पंतसंदर्भात स्पर्धा असल्याचं केलं मान्य, पण...
दरम्यान न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीआधी लोकेश राहुलनं वनडे संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळवण्यासाठी रिषभ पंतसोबत स्पर्धा असते, ही गोष्ट मान्य केली आहे. प्रत्येक मॅच वेळी कोच आणि कॅप्टन यांच्या डोक्यात पहिलं नाव हे पंतच असते. तो प्रतिभावंत खेळाडू आहे. त्याच्यासोबत स्पर्धा असली तरी मी माझ्या खेळण्याच्या शैलीत बदल करणार नाही, ही गोष्टही त्याने बोलून दाखवलीये. लोकेश राहुलनं २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी करुन वनडे संघातील पाचव्या स्थानावरील जागा पक्की केली होती. मिनी वर्ल्ड कप स्पर्धेतही त्यालाच पहिली पसंती देण्यात येत आहे.
रिषभ पंतसंदर्भातील त्या प्रश्नावर केएल राहुल म्हणाला की, मी खोटं नाही बोलणार!
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्याआधी लोकेश राहुल याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान पक्के करण्यासाठी रिषभ पंतसोबत असलेल्या स्पर्धेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर लोकेश राहुल म्हणाला की, "मी खोटं नाही बोलणार! पंतसोबत स्पर्धा आहे. रिषभ पंत प्रतिभावंत खेळा आहे. तो काय करु शकतो ते त्यानं दाखवून दिलं आहे. पंत आक्रमक अंदाजात खेळतो. फार कमी वेळात तो सामन्याला कलाटणी देतो. त्यामुळेच कोच आणि कॅप्टनच्या मनात माझ्या आधी त्याचा विचार सुरु असतो.
संधी मिळते त्यावेळी...
तो पुढे म्हणाला की, ज्या ज्या वेळी मला संधी मिळेल त्या त्यावेळी संघासाठी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. स्पर्धा कितीही असली तरी फलंदाजीच्या शैलीत बदल करण्याचा कधीच विचार करत नाही. मी माझ्या अंदाजात खेळण्यावर भर देतो. तो असो किंवा मी आम्हाला आमच्या खेळाच्या शैलीमुळेच निवडले जाते, असेही त्याने बोलून दाखवले.
पंतसह ही मंडळी बाकावरच
यंदाच्या हंगामातील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विकेट किपर बॅटर रिषभ पंतसह जलगती गोलंदाज अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर यांना अद्याप एकाही सामन्यात संधी मिळालेली नाही. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ बेंच स्टेंथ आजमावणार का? तेही पाहण्याजोगे असेल.
Web Title: IND vs NZ KL Rahul Breaks Silence On Playing Ahead Of Rishabh Pant Champions Trophy 2025 He Says I-Will Not Lie
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.