Join us

Ind Vs NZ : भारताला मोठा धक्का, दुखापतीमुळे रोहित शर्माने सोडले मैदान

भारताचा हंगामी कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्याच्याजागी शिवम दुबे फलंदाजीला आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 13:59 IST

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताला पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यात मोठा धक्का बसला आहे. भारताचा हंगामी कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्याच्याजागी शिवम दुबे फलंदाजीला आला.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाहुण्यांनी नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हंगामी कर्णधार रोहितने यावेळी संघाच्या क्रमवारीत बदल केला. युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला सलामीला पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला. पण संजूला या संधीचा फायदा उठवता आला नाही आणि २ धावा करून तो बाद झाला.

संजू स्वस्तात बाद झाला असला तरी त्यानंतर रोहित आणि लोकेश राहुल यांनी संघाला डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचली. पण मोठा फटका मारण्याचा नादात तो बाद झाला. पण राहुल बाद झाला असला तरी रोहितने एका बाजूने जोरदार फटकेबाजी केली. रोहितच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. रोहितने दुखापतग्रस्त होण्यापूर्वी तीन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६१ धावा केल्या.

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध न्यूझीलंड