चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामना रंगला आहे. या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाचा सुरुवात खराब झाली. कॅप्टन रोहित शर्मा आणि उप कॅप्टन रोहित शर्मा स्वस्तात माघारी फिरल्यावर साऱ्यांच्या नजरा या ३०० वा वनडे सामना खेळणाऱ्या विराट कोहलीवर खिळल्या होत्या. पण 'उडता' ग्लेन फिलिप्स शोनं कोहलीवरही स्वस्तात माघारी परतण्याची वेळ आली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ग्लेन फिलिप्सचा अप्रतिम कॅच, विराटसह अनुष्काची रिअॅक्शनही चर्चेत
विराट कोहलीनं गोळीच्या वेगाने मारलेला फटका ग्लेन फिलिप्सनं फक्त रोखला नाही तर हवेत उडी मारून त्याने त्याचे कॅचमध्ये रुपांतरित करत भारतीय संघाला 'विराट' धक्का दिला. ग्लेन फिलिप्सनं घेतलेला कॅच हा स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वोत्तम कॅचेस पैकी एक आहे. कॅच बघून कोहलीची आणि या सामन्याचा आनंद घेण्यासाठी त्याला चीअर करण्यासाठी स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्का शर्माची रिअॅक्शन बघण्याजोगी होती.
फिल्डिंगचा सर्वोत्तम नजराणा
ग्लेन फिलिप्स हा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे. फलंदाजी करताना धाव घेताना असो किंवा फिल्डिंगवेळी बॉल पकडत हवेत उडी मारून डायरेक्ट स्टंपचा वेध घेण्याचा त्याचा तोरा असो अनेकदा त्याने आपल्या फिल्डिंगचा क्लास नजराणा पेश केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या सलामीच्या लढतीतही त्याने विराटचा कॅच घेतला तसाच कॅच घेत मोहम्मद रिझवानला तंबूत धाडले होते. फरक फक्त एवढाच की, त्यावेळी डाव्या बाजूला आणि यावेळी उजव्या बाजूला उडी मारत त्याने एका हातात कॅच घेऊन फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला.
भारतीय संघानं शुबमन गिल २ (७) आणि रोहित शर्माच्या १५ (१७) रुपात २२ धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या. सलामीवीर माघारी फिरल्यावर कोहलीच्या खांद्यावर डाव सावरण्याची जबाबदारी आली. त्याने दोन चौकार मारून डाव सावरण्याचे संकेत दिले. पण सातव्या षटकात मॅट हेन्रीच्या चेंडूवर आणखी एक चौकार त्याच्या खात्यात जमा होईल असा मारलेला फटका ग्लेन फिलिप्सनं कॅचमध्ये बदलला. कोहलीनं बंदुकीतून सुटलेल्या गोळीच्या वेगानं हा फटका मारला होता. पण ग्लेन फिलिप्सच्या कोहलीच्या अडवा आला. त्याने सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासह किंग कोहलीचा खेळच खल्लास केला. ३०० व्या वनडे सामन्यात कोहलीवर १४ चेंडूत ११ धावा करून तंबूत परतण्याची वेळ आली.