Tim Seifert चं विक्रमी अर्धशतक; २०० च्या स्ट्राइक रेटसह केन विल्यमसन-रॉस टेलरची बरोबरी अन्...

कुलदीपनं जोडी फोडली, अर्शदीपच्या गोलंदाजीवर टिम सिफर्ट फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 20:30 IST2026-01-28T20:28:48+5:302026-01-28T20:30:10+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs NZ 4th T20I Tim Seifet Joint Quickest 50 For NZ vs India Equals Kane Williamson And Ross Taylor Record | Tim Seifert चं विक्रमी अर्धशतक; २०० च्या स्ट्राइक रेटसह केन विल्यमसन-रॉस टेलरची बरोबरी अन्...

Tim Seifert चं विक्रमी अर्धशतक; २०० च्या स्ट्राइक रेटसह केन विल्यमसन-रॉस टेलरची बरोबरी अन्...

IND vs NZ 4th T20I Tim Seifet Joint Quickest 50 For NZ vs India  : विशाखापट्टणमच्या मैदानात न्यूझीलंडचा सलामीवीर टिम सिफर्ट (Tim Seifert) नं तुफानी फटकेबाजीसह २०० च्या स्ट्राइक रेटनं धावा करत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. अवघ्या २५ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घालताना त्याने न्यूझीलंडच्या केन विल्यमसन आणि रॉस टेलर या दिग्गजांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचा डाव त्याने या खेळीसह साधला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

टिम सिफर्टचं विक्रमी अर्धशतक

पॉवरप्लेमध्ये स्फोटक फलंदाजी करताना टिम सिफर्टनं २५ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली.  याआधी केन आणि रॉस या दोघांनी टीम इंडियाविरुद्ध २५ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. टिम सिफर्टनं या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. पण त्याची कामगिरी या दोन दिग्गजांपेक्षा भारी ठरते. कारण त्याने भारतीय मैदानात ही धमाकेदार खेळी केली. या जोडीनं २०२० मध्ये ऑकलँडच्या मैदानात ही कामगिरी केली होती.   

IND vs NZ : शानदार फॉर्ममध्ये असणारा इशान किशन टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून OUT, कारण...

डेवॉन कॉन्वेच्या साथीनं शतकी भागीदारीचा खास डावही साधला

टिम सिफर्टनं चौथ्या टी-२० सामन्यात पहिल्या षटकापासून मोठे फटके खेळत संघाला दमदार सुरुवात करून दिली. डेवॉन कॉन्वेच्या साथीनं त्याने पहिल्या विकेटसाठी ५० चेंडूत १०० धावांची भागीदारी रचली. या भागीदारीत त्याने २७ चेंडूत ५५ धावा केल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडच्या संघाने टी-२० मध्ये टीम इंडियाविरुद्ध पहिल्या विकेटसाठी केलेली ही दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी ठरली. याआधी २०१७ मध्ये राजकोटच्या मैदानात मुन्रो आणि गप्टिल जोडीनं पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी रचली होती. 

कुलदीपनं जोडी फोडली, अर्शदीपच्या गोलंदाजीवर टिम सिफर्ट फसला

डेवॉन कॉन्वेच्या रुपात कुलदीप यादवनं टीम इंडियाला पहिल यश मिळवून देताना न्यूझीलंडची सलामी जोडी फोडली. डेवॉन कॉन्वे २३ चेंडूत ४४ धावा करून बाद झाला. त्यानंतर टिम सिफर्टला अर्शदिप सिंगनं चालते केले. त्याने ३६ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली.

Web Title : टिम सिफर्ट ने भारत के खिलाफ विस्फोटक अर्धशतक से रिकॉर्ड की बराबरी की।

Web Summary : टिम सिफर्ट ने भारत के खिलाफ तेजी से अर्धशतक बनाकर न्यूजीलैंड के एक रिकॉर्ड की बराबरी की। उनकी विस्फोटक पारी में केन विलियमसन और रॉस टेलर के रिकॉर्ड की बराबरी की। सिफर्ट की आक्रामक बल्लेबाजी ने न्यूजीलैंड को एक मजबूत शुरुआत दिलाने में मदद की, जिसमें शतकीय साझेदारी भी शामिल थी।

Web Title : Tim Seifert equals record with explosive half-century against India.

Web Summary : Tim Seifert smashed a quickfire half-century against India, equaling a New Zealand record. His explosive innings, featuring a high strike rate, matched Kane Williamson and Ross Taylor. Seifert's aggressive batting helped New Zealand achieve a strong start, including a century partnership.