Join us
Daily Top 2Weekly Top 5

टिम सिफर्ट-कॉन्वेच्या शतकी भागीदारीनंतर डॅरिल मिचेलची फटकेबाजी! टीम इंडियासमोर 'विक्रमी' टार्गेट

टीम इंडियाविरुद्ध न्यूझीलंडने उभारलेली ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 21:01 IST

Open in App

India vs New Zealand, 4th T20I : टिम सिफर्ट आणि डेवॉन कॉन्वेच्या शतकी भागीदारीनंतर डॅरिल मिचेलनं केलेल्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर विशाखापट्टणच्या मैदानात न्यूझीलंडच्या संघाने टीम इंडियासमोर २१६ धावांचे टार्गेट सेट केले आहे. विशाखापट्टणमच्या मैदानात टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कधीच एवढ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग झालेला नाही. त्यामुळे विजयी 'चौकार' मारण्यासाठी टीम इंडिया  विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचे आव्हान आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

न्यूझीलंडनं टीम इंडियाविरुद्ध उभारली दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या

टिम सिफर्टचं दमदार अर्धशतकी खेळीसह डेवॉन कॉन्वे आणि डॅरिल मिचेलच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात २१५ धावा केल्या आहेत. टीम इंडियाविरुद्ध न्यूझीलंडच्या संघाने केलेली ही दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या आहे. याआधी २०१९ मध्ये न्यूझीलंडच्या संघाने आपल्या वेलिंग्टनच्या घरच्या मैदानात ६ विकेट्सच्या मोबदल्यात २१९ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

Tim Seifert चं विक्रमी अर्धशतक; २०० च्या स्ट्राइक रेटसह केन विल्यमसन-रॉस टेलरची बरोबरी अन्...

विशाखापट्टणमच्या मैदानात टी-२० क्रिकेटमध्ये यशस्वी धावसंख्येचा पाठलाग करण्याचा रेकॉर्ड

  • २१० दिल्ली विरुद्ध लखनौ (२०२५)
  • २०१९ ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (२०२३)
  • १८५ कर्नाटक विरुद्ध आंध्र प्रदेश (२०१९)   

 

टिम सिफर्ट-डेवॉन कॉन्वेची शतकी भागीदारी, अखेरच्या षटकात डॅरिल मिचेलची फटकेबाजी

सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी संघाला दमदार सुरुवात करून देत भारतीय कर्णधाराचा निर्णय व्यर्थ ठरवला. टिम सिफर्ट आणि डेवॉन कॉन्वे यांनी पहिल्या विकेटसाठी ५० चेंडूत १०० धावांची भागीदारी रचली.  डेवॉन कॉन्वे २३ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४४ धावा करून बाद झाला. कुलदीप यादवनं टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. दमदार फलंदाजी करणाऱ्या टिम सिफर्टला अर्शदीपनं तंबूचा रस्ता दाखवला. त्याने ३६ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली. ग्लेन फिलिप्स १६ चेंडूत २४ धावा करून परतल्यावर न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलनं अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. त्याने १८ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३९ धावांची नाबाद खेळी करत संघाच्या धावफलकावर २१५ धावा लावल्या. टीम इंडियाकडून कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी २-२ तर जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

English
हिंदी सारांश
Web Title : Seifert-Conway century stand, Mitchell's blitz sets record target for India.

Web Summary : Seifert and Conway's century partnership, followed by Mitchell's explosive batting, propelled New Zealand to set a formidable 216-run target for India in Visakhapatnam. Chasing this will be a record effort for India.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंड