Join us
Daily Top 2Weekly Top 5

Abhishek Sharma New Record : अभिषेक शर्माचं वादळी अर्धशतक; हिटमॅन रोहित शर्माचा विक्रमही मोडला

भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील हे दुसरे जलद अर्धशतक ठरले. युवराज सिंगच्या पाठोपाठ त्याचा चेला अभिषेक शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 21:37 IST

Open in App

IND vs NZ 3rdT20I Abhishek Sharma Second Fastest 50 For India : गुवाहाटीच्या मैदानात न्यूझीलंडच्या संघाने दिलेल्या १५४ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने संजू सॅमसनच्या रुपात पहिल्या चेंडूवरच पहिली विकेट गमावली. पण या परिस्थितीतही अभिषेक शर्मानं धमाकेदार खेळीचा नजराणा पेश करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. डफीच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार मारत अवघ्या १४ चेंडूत त्याने अर्धशतक साजरे केले. भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील हे दुसरे जलद अर्धशतक ठरले. भारताकडून सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड हा युवराज सिंगच्या नावे आहे. २००७ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध त्याने १२ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्याच्या पाठोपाठ आता या यादीत त्याचा चेला अभिषेक शर्माचा नंबर लागतो.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

हिटमॅन रोहित शर्माचा विक्रमही मोडला

अभिषेक शर्मानं न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तिसरा षटकार मारताच रोहित शर्माचा मोठा विक्रमही मोडीत काढला. याआधी न्यूझीलंड विरुद्धच्या द्विपक्षीय टीृ-२० मालिकेत सर्वाधिक १० षटकारांचा विक्रम हा रोहित शर्माच्या नावे होता. अभिषेक शर्मानं न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात ८ षटकार मारले होते. तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने रोहित शर्माला मागे टाकत न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत सिक्सर किंग होण्याचा नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

डेवॉन कॉन्वेसमोर हर्षित राणाचा ‘बाणा’; हार्दिक पांड्यानं घेतला डोळ्याचं पारणं फेडणारा कॅच (VIDEO)

अभिषेक शर्मानं आपल्या आतापर्यंतच्या अल्प कारकिर्दीत नवव्यांदा २५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतकी डाव साधला आहे. या कामगिरीसह त्याने सूर्यकुमार यादवच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. सूर्यानंही आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत ९ वेळा अशी कामगिरी केली आहे. फिल सॉल्ट आणि इविन लुइस यांनी प्रत्येकी ७-७ वेळा ही अशी कामगिरी केल्याचा रेकॉर्ड आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Abhishek Sharma's Blazing Fifty Breaks Rohit Sharma's Record

Web Summary : Abhishek Sharma's explosive fifty against New Zealand broke Rohit Sharma's record for most sixes in a bilateral T20 series. He smashed a quickfire half-century in just 14 balls, the second-fastest for India in T20Is, following Yuvraj Singh.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडअभिषेक शर्मायुवराज सिंगरोहित शर्मा