IND vs NZ 3rd T20 : भारतीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड संघ (IND vs NZ) यांच्यातील तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी अहमदाबाद येथे होणार आहे. काल दोन्ही संघ अहमदाबादला पोहोचले होते, त्यानंतर हॉटेलमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. पण हॉटेलमध्ये भारतीय खेळाडूंचे स्वागत होत असताना इशान किशनच्या एका कृतीवर पृथ्वी शॉ नाराज झाल्याचे दिसला. इशानने पृथ्वीची टोपी काढून चिडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे तो नाराज झाला. पृथ्वीने त्याला रोखले. बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडीओत हे सर्व दिसत आहे.
पृथ्वी शॉला तिसऱ्या ट्वेंटी-२०त प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार? हार्दिक पांड्या 'या' खेळाडूला बाहेर बसवणार
पृथ्वी शॉला संधी मिळेल का?
टीम इंडियाचे सलामीवीर शुभमन गिल आणि इशान किशन हे आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरले आहेत. गिलने वन डे मालिकेत चमकदार कामगिरी केली होती, परंतु ट्वेंटी-२० मध्ये त्याला अपयश आले. त्यामुळे या दोन युवा फलंदाजांपैकी एकाला तिसऱ्या ट्वेंटी-२०मध्ये बाहेर बसावे लागले तर पृथ्वीला संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे. यासोबतच कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना संघात स्थान देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवल्याने मालिका १-१ अशी बरोबरीत आहे आणि अहमदाबादमध्ये निर्णायक सामना जिंकण्याची दोन्ही संघांची इच्छा आहे. लखनौच्या फिरकी खेळपट्टीवर भारतीय फिरकीपटूंनी किवी फलंदाजांना क्रिझवर थांबण्याची संधी दिली नाही. मात्र, धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनाही खूप संघर्ष करावा लागला.
या सामन्यानंतर हार्दिकने खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले. तो म्हणाला, “खरं सांगायचं तर हा विकेटचा धक्का होता. आम्ही आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये मला फरक दिसला नाही. मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे, पण या दोन्ही विकेट ट्वेंटी-२० साठी बनवल्या गेल्या नाहीत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"