India vs New Zealand, 3rd T20I Live Update : भारतीय संघ कोलकाताच्या इडन गार्डनवर आज न्यूझीलंडवर क्लिन स्वीप मिळवण्यासाठी उतरणार आहे. पहिल्या दोन सामन्यात भारतानं लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवला आहे. मालिका जिंकल्यामुळे भारतीय संघ आज संघात काही बदल करण्याच्या तयारीत असेल. कर्णधार रोहित शर्मानं ( Rohit Sharma) दुसऱ्या सामन्यानंतर तशी शक्यता फेटाळली होती. पण, आजच्या सामन्यात त्यानं दोन बदल केले. रोहितनं पुन्हा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराजनं दुखापतीमुळे माघार घेतली होती आणि हर्षल पटेलला पदार्पणाची संधी मिळाली होती. त्यात त्यानं २ विकेट्स घेत मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कारही पटकावला. तिसरा सामना इडन गार्डनवर होणार आहे. इडन गार्डनवर 2019नंतर आंतरराषट्रीय सामना झालेला नाही. 2019मध्ये टीम इंडियानं डे नाईट कसोटीत बांगलादेशवर विजय मिळवला होता. त्यामुळे आता ही खेळपट्टी कशी असेल, याची पाहणी करण्यासाठी राहुल द्रविड शनिवारीच स्टेडियमवर गेला होता. डे नाइट कसोटीत 28 विकेट्स पडल्या होत्या.
आजच्या सामन्यात न्यूझीलंडचे नेतृत्व मिचेल सँटनर करणार आहे. टीम इंडियात दोन बदल पाहायला मिळत आहेत. इशान किशन व युझवेंद्र चहल यांचे पुनरागमन झाले आहे, तर लोकेश राहुल व आर अश्विन यांना विश्रांती देण्यात आली आहे.
भारतीय संघ -
रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, दीपक चहर, अक्षर पटेल