Join us  

IND vs NZ, 3rd T20I Live Update : भारतीय संघ आज नवी जोडी सलामीला उतरवणार, आणखी एक गोलंदाज पदार्पण करणार

India vs New Zealand, 3rd T20I Live Update : भारतीय संघ कोलकाताच्या इडन गार्डनवर आज न्यूझीलंडवर क्लिन स्वीप मिळवण्यासाठी उतरणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 6:04 PM

Open in App

India vs New Zealand, 3rd T20I Live Update : भारतीय संघ कोलकाताच्या इडन गार्डनवर आज न्यूझीलंडवर क्लिन स्वीप मिळवण्यासाठी उतरणार आहे. पहिल्या दोन सामन्यात भारतानं लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवला आहे. मालिका जिंकल्यामुळे भारतीय संघ आज संघात काही बदल करण्याच्या तयारीत असेल. कर्णधार रोहित शर्मानं ( Rohit Sharma) दुसऱ्या सामन्यानंतर तशी शक्यता फेटाळली असली तरी आज संघात २-३ बदल नक्की पाहायला मिळतील. 

इडन गार्डनवरील या लढतीत आवेश खान पदार्पण करू शकतो. दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराजनं दुखापतीमुळे माघार घेतली होती आणि हर्षल पटेलला पदार्पणाची संधी मिळाली होती. त्यात त्यानं २ विकेट्स घेत मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कारही पटकावला. आजच्या लढतीत प्लेइंग इलेव्हनमध्ये आवेश खानचे पदार्पण होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. युझवेंद्र चहलचेही संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. दीपक चहर याच्याजागी आवेशला संधी मिळेल, तर आर अश्विनसोबत चहल फिरकीची जबाबदारी सांभाळू शकतो. 

लोकेश राहुललाही विश्रांती दिली जाऊ शकते आणि अशात ऋतुराज गायकवाडरोहित शर्मा ही जोडी आज सलामीला उतरू शकते. रिषभ पंतला विश्रांती देऊन  इशान किशनला संधी दिली जाऊ शकते.   संभाव्य प्लेइंग इलेव्हन ( India Playing XI vs NZ 3rd T20) - ऋतुराज गायकवाड, रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युझवेंद्र चहल 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माऋतुराज गायकवाडयुजवेंद्र चहल
Open in App