IND vs NZ, 3rd T20I Live : 10 चौकार, 6 षटकार! शुभमन गिलचे खणखणीत शतक; एक वेगळा पराक्रम नोंदवणारा पाचवा भारतीय ठरला

शुभमन गिलचा फॉर्म न्यूझीलंडच्या गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला. मागील दोन सामन्यांची कसर त्याने आजच्या सामन्यात भरून काढली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 08:28 PM2023-02-01T20:28:44+5:302023-02-01T20:30:09+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 3rd T20I Live : Maiden T20I hundred for Shubman Gill, became a fifth indian Batsman to smash at least 1 Century for in all three formats  | IND vs NZ, 3rd T20I Live : 10 चौकार, 6 षटकार! शुभमन गिलचे खणखणीत शतक; एक वेगळा पराक्रम नोंदवणारा पाचवा भारतीय ठरला

IND vs NZ, 3rd T20I Live : 10 चौकार, 6 षटकार! शुभमन गिलचे खणखणीत शतक; एक वेगळा पराक्रम नोंदवणारा पाचवा भारतीय ठरला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 3rd T20I Live : इशान किशन दुसऱ्याच षटकात माघारी परतला तरी भारताने सामन्यावर चांगली पकड घेतली. राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) आणि शुभमन गिल यांनी ८० धावांची भागीदारी करताना १० षटकांत फलकावर शतकी आकडा चढवला. शुभमन गिलचा फॉर्म न्यूझीलंडच्या गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला. मागील दोन सामन्यांची कसर त्याने आजच्या सामन्यात भरून काढली. वन डे मालिका गाजवल्यानंतर शुभमनने ट्वेंटी-२०तही न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धू धू धुतले... 

प्रथम फलंदाजीचा निर्णय भारताच्या पथ्यावर काही पडला नाही. मायकेल ब्रेसवेलने दुसऱ्याच षटकात भारताला धक्का दिला. ब्रेसवेलने टाकलेला चेंडू इशानला समजला नाही अन् तो पॅडवर आदळला.. LBW ची जोरदार अपील झाले अन् मैदानावरील अम्पायरने OUTचा हात उचलला. इशानला १ धावेवर माघारी जावे लागले. राहुल त्रिपाठी व शुभमन यांनी चांगली फटकेबाजी करून २८ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. शुभमनला ३४ धावांवर जीवदान मिळाले. राहुलने काही सुरेख फटके मारले. ९व्या षटकात त्याने इश  सोढीलाही खणखणीत षटकार मारला अन् दुसरा चेंडूही स्वीपद्वारे सीमापार पाठवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा प्रयत्न फसला अन् फर्ग्युसनने झेल घेतला. राहुल २२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावांवर माघारी परतला अन् शुभमनसह त्याची ४२ चेंडूंतील ८० धावांची भागीदारी संपुष्टात आली. 

सूर्यकुमार यादव मैदानावर येताच स्टेडियम दणाणून निघाले. सूर्यानेही त्याचा फॉर्म दाखवताना सुरेख फटके मारले. पण, २४ धावांवर ब्रेसवेलने त्याचा अप्रतिम झेल टिपला. सूर्या व गिलने २५ चेंडूंत ३८ धावा जोडल्या. शुभमन आज किवी गोलंदाजांना जुमानत नव्हता. १६व्या षटकात त्याने डिप स्क्वेअर लेगला दोन सलग षटकार खेचले. शुभमनने हार्दिक पांड्यासह २२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ब्लेअर लिस्टरने टाकलेल्या १७व्या षटकात शुभमनने ६, ४, ६ असे फटके मारले. गिलने ५४ चेंडूंत ट्वेंटी-२०तील शतक पूर्ण केले. 

कसोटी, वन डे व ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये शतक किमान एक शतक झळकाणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला. सुरेश रैना, रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली यांनी हा पराक्रम केला आहे.  दीपक हुडा व सूर्यकुमार यांनी ट्वेंटी-२०त शतक झळकावले आहे. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs NZ, 3rd T20I Live : Maiden T20I hundred for Shubman Gill, became a fifth indian Batsman to smash at least 1 Century for in all three formats 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.