India vs New Zealand, 3rd T20I Live : जगातील सर्वांत मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणारा तिसरा आणि निर्णायक ट्वेंटी-२० सामना जिंकून मालिका २-१ अशी जिंकण्याच्या निर्धाराने भारत आणि न्यूझीलंड संघ बुधवारी एकमेकांविरुद्ध भिडतील. मालिकेतील आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांत भारताच्या आघाडीच्या फळीला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
मालिकेतील दोन्ही सामने खेळपट्ट्यांमुळे गाजले. पहिल्या सामन्यात ज्या खेळपट्टीवर किवींनी आव्हानात्मक मजल मारली, त्याच खेळपट्टीवर भारतीय फलंदाजी कोलमडली. यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या १०० धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी भारताला अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूपर्यंत झुंजावे लागले होते. त्यामुळे अहमदाबादच्या खेळपट्टीकडेही क्रिकेटचाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शुभमन गिल, ईशान किशन आणि राहुल त्रिपाठी या फलंदाजांना संधी साधण्यात यश आले नाही. त्यामुळे तिसऱ्या टी-२० सामन्यात
पृथ्वी शॉला संधी मिळणार का, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे, पण पृथ्वीला आजही संधी मिळालेली नाही. युझवेंद्र चहलच्या जागी उम्रान मलिक संघात आला.
- शुभमन गिलची मागील पाच ट्वेंटी-२० सामन्यांमधील कामगिरी - ७,५,४६,७,११
- इशान किशनची मागील पाच ट्वेंटी-२० सामन्यांमधील कामगिरी - ३७, २,१,४,१९
भारतीय संघ- शुभमन गिल, इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर , कुलदीप यादव, उम्रान मलिक, अर्शदीप सिंग, शिवम मावी
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"