Join us

IND vs NZ, 3rd T20I Live : युझवेंद्र चहलने दोन दिवसांपूर्वी सर्वाधिक विकेट्सचा विक्रम नोंदवला; आज हार्दिकने त्याला बाहेर केला, जाणून घ्या कारण

India vs New Zealand, 3rd T20I Live : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या तीन ट्वेंटी-२० सामन्यातील निर्णायक सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 19:08 IST

Open in App

India vs New Zealand, 3rd T20I Live : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या तीन ट्वेंटी-२० सामन्यातील निर्णायक सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. पण, पृथ्वी शॉ याला तिन्ही सामन्यात बाकावरच बसवून ठेवले गेले. फिरकीपटू युझवेंद्र चहल याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करत उम्रान मलिकला संधी दिली गेली. मागील सामन्यात युझवेंद्रने भारताकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक विकेट्सचा विक्रम नावावर केला होता आणइ आज त्याला बाहेर केल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. 

मालिकेतील दोन्ही सामने खेळपट्ट्यांमुळे गाजले. पहिल्या सामन्यात ज्या खेळपट्टीवर किवींनी आव्हानात्मक मजल मारली, त्याच खेळपट्टीवर भारतीय फलंदाजी कोलमडली. यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या १०० धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी भारताला अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूपर्यंत झुंजावे लागले होते. त्यामुळे अहमदाबादच्या खेळपट्टीकडेही क्रिकेटचाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.  

भारतीय संघ- शुभमन गिल, इशान किशन, राहुल त्रिपाठी,  सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर , कुलदीप यादव, उम्रान मलिक, अर्शदीप सिंग, शिवम मावी

हार्दिक काय म्हणाला?आयपीएलची फायनल येथे खेळलो होतो तेव्हा चेंडू दुसऱ्या डावात खूपच डिप राहिलेला दिसला.  ही खेळपट्टी मस्त आहे आणि त्यामुळे प्रथम फलंदाजी करावीशी वाटली. दोन आव्हानात्मक खेळपट्टींवर खेळल्यानंतर आज फलंदाजांची  कामगिरी कशी होते, यावर सर्वांचे लक्ष आहे. हार-जीत हा खेळाचा भाग आहे, परंतु यातून शिकत राहायला हवं. ही खेळपट्टी जलदगती गोलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे उम्रानला युझवेंद्रच्या जागी संधी दिली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्यायुजवेंद्र चहल
Open in App