India vs New Zealand, 3rd ODI : इंदूरच्या होळकर स्टे़डियमवर रंगलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना दोन शतकवीरांच्या जोरावर निर्धारित ५० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात ३३७ धावा करत टीम इंडियासमोर ३३८ धावांचे टार्गेट सेट केले आहे. शुभमन गिलनं या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्शदीप सिंग याने पहिल्या षटकात पहिली विकेट घेतली. एवढेच नाही तर दुसऱ्या षटकात हर्षित राणानेही विकेटसह आपल्या स्पेलची सुरुवात केली. पण सलामीची जोडी स्वस्तात माघारी फिरल्यावर डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स जोडी जमली. या दोघांच्या शतकी खेळीनंतर अखेरच्या षटकात ब्रेसवेलनं तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
न्यूझीलंडकडून दोन शतकवीर! मिचेल-फिलिप्स जोडीनं चौथ्या विकेटसाठी केली द्विशतकी भागीदारी
निर्णायक वनडे सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने हेन्री निकोल्स आणि डेवॉन कॉन्वे ही सलामी जोडी धावफलकावर अवघ्या ५ धावा असताना तंबूत परतली. डॅरिल मिचेलच्या साथीनं विल यंगनं अर्धशतकी भागीदारी रचली. पण हर्षित राणानं त्याच्या रुपात ५८ धावांवर न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. पण त्यानंतर मिचेल आणि फिलिप्स जोडी जमली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी १८६ चेंडूत २१९ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावरच न्यूझीलंडच्या संघाने निर्णायक लढाई ३०० पारची केली. डॅरिल मिचेल याने सलग दुसरे शतक झळकावताना १३१ चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १३७ धावांची खेळी साकारली. ग्लेन फिलिप्सनं ८८ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०६ धावा केल्या. अखेरच्या षटकात कर्णधार मायकेल ब्रेसवनलनं १८ चेंडूत २८ धावा करत संघाच्या धावफलकावर ८ बाद ३३७ धावा लावणारी उपयुक्त खेळी साकारली.
Daryl Mitchell नं सेंच्युरीसह रचला इतिहास! टीम इंडियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
गोलंदाजीत अर्शदीपसह हर्षित राणाचा जलवा
पहिल्या षटकात टीम इंडियाला पहिले यश मिळवून देणाऱ्या अर्शदीप सिंगनं १० षटकांच्या आपल्या कोट्यात ६३ धावा खर्च करत एका निर्धाव षटकांसह ३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. हर्षित राणा टीम इंडियाकडून सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने १० षटकात ८४ धावा खर्च केल्या. पण त्याने ३ विकेट्सचा डावही साधला. याशिवाय मोहम्मद सिराजनं १० षटकांत ४३ धावा खर्च करून एक तर कुलदीप यादवन ६ षटकात ४८ धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. रवींद्र जडेजा या सामन्यातही विकेटलेस राहिला.
Web Summary : New Zealand set a target of 338 runs against India in the third ODI, powered by centuries from Daryl Mitchell and Glenn Phillips. Despite early wickets, their partnership and a late surge boosted the score.
Web Summary : न्यूजीलैंड ने तीसरे वनडे में भारत के खिलाफ 338 रनों का लक्ष्य रखा, डेरिल मिचेल और ग्लेन फिलिप्स के शतकों से प्रेरित। शुरुआती विकेटों के बावजूद, उनकी साझेदारी और अंतिम ओवरों में तेजी से स्कोर बढ़ा।