Join us  

IND vs NZ, 2nd Test Live Updates : शुबमन गिलची दुखापत त्यात आणखी एका फलंदाजाची भर; दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला धक्का

IND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत विजयाच्या दिशेनं पाऊल टाकले आहे. न्यूझीलंडसमोर विजयासाठी ५४० धावांचं तगडं आव्हान उभं करून टीम इंडियानं निम्मी लढाई जिंकली.पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 3:47 PM

Open in App

IND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत विजयाच्या दिशेनं पाऊल टाकले आहे. न्यूझीलंडसमोर विजयासाठी ५४० धावांचं तगडं आव्हान उभं करून टीम इंडियानं निम्मी लढाई जिंकली. त्यात आर अश्विननं तीन विकेट्स घेत किवींना दुसऱ्या डावातही धक्के दिले. पण, भारतीय संघालाही दोन मोठे धक्के बसले.  भारताचे दोन्ही सलामीवीर शुबमन गिल व मयांक अग्रवाल हे क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरले नाहीत. या दोघांबाबत बीसीसीआयनं मोठे अपडेट्स दिले आहेत.

भारतानं दुसरा डाव ७ बाद २७६ धावांवर घोषित करून ५३९ धावांची भक्कम आघाडी घेतली. मयांक अग्रवालची बॅट पुन्हा एकदा तळपली. यावेळेस त्याला शुबमन गिल,  चेतेश्वर पुजारा,  अक्षर पटेल व विराट कोहली यांची साथ मिळाली. एजाजनं दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या.  एजाझनं १४ विकेट्स घेताच तो न्यूझीलंडकडून कसोटी सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणारा दुसरा गोलंदाज ठरला. १९८५ मध्ये रिचर्ड्स हॅडली यांनी एका सामन्यात १५ विकेट्स घेतल्या होत्या. भारताच्या पहिल्या डावातील ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. 

मयांक व शुबमन हे दुखापतीमुळे क्षेत्ररक्षणासाठी आले नाहीत. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना मयांकच्या उजव्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. शुबमनला किवींच्या पहिल्या डावातील अखेरच्या काही षटकांत बोटावर चेंडू आदळला होता. त्यामुळे तो कालही मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी आला नव्हता. त्याच्याजागी पुजारा सलामीला आला होता.     

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडमयांक अग्रवालशुभमन गिल
Open in App