Join us

IND vs NZ, 2nd Test Live Update : टीम इंडियाता मोठे धक्के; दुसऱ्या कसोटीपूर्वी अजिंक्य रहाणेसह तीन प्रमुख खेळाडूंची दुखापतीमुळे माघार

India vs New Zealand, 2nd Test Live Update : कर्णधार विराट कोहलीचे ( Virat Kohli) पुनरागमन झाल्यानं टीम इंडियाची ताकद आणखी वाढली आहे. पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 09:41 IST

Open in App

India vs New Zealand, 2nd Test Live Update : भारत-न्यूझीलंड यांच्यातला दुसरा कसोटी सामना आजपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.  कर्णधार विराट कोहलीचे ( Virat Kohli) पुनरागमन झाल्यानं टीम इंडियाची ताकद आणखी वाढली आहे. पण, अंतिम ११मधील कोणाला बाहेर करावे, असा पेच निर्माण झाला आहे. त्यात दुसऱ्या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी भारताचे तीन प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत आणि त्यांनी मुंबई कसोटीतून माघार घेतली आहे. दरम्यान, दुसरी कसोटीच्या पहिल्या दिवसाचा निर्णय १०.३० वाजता घेतला जाईल. 

जलदगती गोलंदाज इशांत शर्मा याच्या डाव्या हाताच्या करंगळीला कानपूर कसोटीच्या अखेरच्या दिवशी दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो बराच काळ मैदानाबाहेर होता. त्यानं फार कमी षटकं फेकली, परंतु आता त्यानं दुसऱ्या कसोटीतून माघार घेतल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे. बीसीसीआयची वैद्यकिय टीम त्याच्यावर उपचार करत आहे.

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्याही उजव्या हाताला दुखापत झाली आहे आणि त्याच्या हाताला सूज आली आहे त्यामुळे त्याला विश्रांतीचा सल्ला दिला गेला असून तोही मुंबई कसोटीत खेळणार नाही.  उपकर्णधार अजिंक्य रहाणे यालाही पहिल्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली आणि त्यानंही या सामन्यातून माघार घेतली आहे.   

आता कशी असेल टीम इंडियामयांक अग्रवाल,  शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, वृद्धीमान सहा, केएस भारत, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, उमेश यादव 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडअजिंक्य रहाणेविराट कोहलीइशांत शर्मारवींद्र जडेजा
Open in App