IND vs NZ, 2nd T20I : रिषभ पंतला जर्सीवर लावावी लागली चिकटपट्टी; जाणून घ्या त्यामागचं कारण 

IND vs NZ, 2nd T20I : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) फुल टाईम नेतृत्वाखाली टीम इंडियानं पहिली ट्वेंटी-२० मालिका जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 12:44 PM2021-11-20T12:44:44+5:302021-11-20T12:46:28+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 2nd T20I : THIS is why Rishabh Pant had a tape on his jersey during 2nd T20I clash in Ranchi | IND vs NZ, 2nd T20I : रिषभ पंतला जर्सीवर लावावी लागली चिकटपट्टी; जाणून घ्या त्यामागचं कारण 

IND vs NZ, 2nd T20I : रिषभ पंतला जर्सीवर लावावी लागली चिकटपट्टी; जाणून घ्या त्यामागचं कारण 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs NZ, 2nd T20I : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) फुल टाईम नेतृत्वाखाली टीम इंडियानं पहिली ट्वेंटी-२० मालिका जिंकली. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२०त टीम इंडियानं  ७ विकेट्स व १६ चेंडू राखून विजय मिळवला आणि मालिकेत २-०  अशी विजयी आघाडी घेतली आहे.  मालिकेतील तिसरा सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर होणार आहे. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांच्या अर्धशतकी खेळीनंतर भारताला  विजयासाठी १८ चेंडूंत ११ धावांची गरज असताना रिषभ पंतनं दोन खणखणीत षटकार मारून किवींचा पराभव पक्का केला. पण, रांचीत झालेल्या दुसऱ्या सामन्यात रिषभ पंतची ( Rishabh Pant) जर्सी चर्चेचा विषय ठरली आहे.  


रिषभच्या जर्सीवर चिकटपट्टी लावलेली दिसली आणि त्यामागचं कारण समोर आलं आहे. रिषभ या सामन्यात आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील जर्सी घालून मैदानावर उतरला होता. जेव्हा त्याच्या हे लक्षात आले, तेव्हा त्यानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या लोगोवर चिकटपट्टी लावली.  भारताचे सर्व खेळाडू या मालिकेसाठीची जर्सी घालून मैदानावर उतरले, फक्त रिषभच वेगळ्या जर्सीत दिसला. 

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. मार्टीन गुप्तील ( ३१), डॅरील मिचेल ( ३१), ग्लेन फिलिप्स ( ३४),  मार्क चॅपमॅन ( २१) आणि टीम सेइफर्ट  ( १३) यांनी योगदान दिले. भारताचा फिरकीपटू आर अश्विन यानं त्याच्या चार षटकांत १९ धावांत १ विकेट घेतली. हर्षलनं २५ धावांत २ विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.न्यूझीलंडनं ६ बाद १५३ धावा केल्या. 
प्रत्युत्तरात भारतानं १७.२ षटकांत हे लक्ष्य पार केले. रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११७ धावा जोडल्या. लोकेश ४९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६५ धावा केल्या, तर रोहित ३६ चेंडूंत १ चौकार व ५ षटकारांसह ५५ धावांवर बाद झाला.  

Web Title: IND vs NZ, 2nd T20I : THIS is why Rishabh Pant had a tape on his jersey during 2nd T20I clash in Ranchi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.