IND vs NZ 2nd T20I : रचिनसह सँटनरची फटकेबाजी! शतकी सामन्यात टीम इंडियासमोर २०० पारचं टार्गेट

रचिन रवींद्रची बॅट तळपली, पण कुलदीपनं आपल्या फिरकीतली जादू दाखवली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 21:02 IST2026-01-23T21:01:00+5:302026-01-23T21:02:32+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs NZ 2nd T20I Mitchell Santner Rachin Ravindra Shine New Zealand Set A Target Of 209 Runs Against India Kuldeep Yadav Take 2 Wickets | IND vs NZ 2nd T20I : रचिनसह सँटनरची फटकेबाजी! शतकी सामन्यात टीम इंडियासमोर २०० पारचं टार्गेट

IND vs NZ 2nd T20I : रचिनसह सँटनरची फटकेबाजी! शतकी सामन्यात टीम इंडियासमोर २०० पारचं टार्गेट

रायपूरच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात २०८ धावा करत घरच्या मैदानात शंभरावा टी-२० सामना खेळणाऱ्या टीम इंडियासमोर २०९ धावांचे टार्गेट सेट केले आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बरोबरीचा डाव साधण्याचा दबाव असताना न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. डेवॉन कॉन्वे आणि टिम सिफर्ट या जोडीनं पहिल्या विकेटसाठी २० चेंडूत ४३ धावांची भागीदारी रचली. ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत असताना हर्षित राणानं कॉन्वेला १९(९) तर वरुण चक्रवर्तीनं टिम सिफर्टला २४ (१३) तंबूचा रस्ता दाखवत पॉवर प्लेमध्येच टीम इंडियाला मोठा दिलासा दिला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

रचिन रवींद्रची बॅट तळपली, पण कुलदीपनं आपल्या फिरकीतली जादू दाखवली अन्...

सलामी जोडीनं परफेक्ट प्लॅटफॉर्म सेट केल्यावर रचिन रवींद्रनं आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा पेश केला. त्याने २६ चेंडूत २ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारासह ४४ धावांची खेळी केली. पण कुलदीप यादवनं त्याला अर्धशतकाच्या आधीच आपल्या जाळ्यात अडकवले. याआधी चायनामन कुलदीपनं गत सामन्यात दमदार अर्धशतक झळकावणाऱ्या ग्लेन फिलिप्स १३ चेंडूत १९ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. वनडे मालिकेत धमाका करणारा डॅरिल मिचल सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात अपयशी ठरला. शिवम दुबेनं त्याची विकेट घेतली. त्याने ११ चेंडूत ११ धावा केल्या.  

हर्षित राणाचा कहर! न्यूझीलंडच्या धाकड फलंदाजासाठी ठरतोय कर्दनकाळ; सेलिब्रेशनचा VIDEO व्हायरल

कर्णधार मिचेल सँटनरची उपयुक्त खेळी, न्यूझीलंडनं २०० पारची केली लढाई

१२९ धावांवर न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परतला होता. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मिचेल सँटनरनं २७ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४७ धावांची नाबाद खेळी करत टीम इंडियाविरुद्धची लढाई २०० पारची केली. झॅक फॉल्केस ८ चेंडूत नाबाद १५ धावा करत कर्णधाराला उत्तम साथ दिली. कुलदीप यादवनं भारताकडून सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. याशिवाय शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. अर्शदीप सिंग टीम इंडियाकडून सर्वात महागडा गोलंदाज ठरला.  विकेट लेस राहिलेल्या अर्शदीपनं ४ षटकात ५३ धावा खर्च केल्या.

Web Title : न्यूजीलैंड ने भारत को दूसरे टी20 में 209 का लक्ष्य दिया।

Web Summary : न्यूजीलैंड ने दूसरे टी20 में भारत के खिलाफ 208/6 रन बनाए, 209 रनों का लक्ष्य रखा। रचिन रवींद्र के 44 और कॉनवे और सीफर्ट के योगदान ने पारी को आगे बढ़ाया। कुलदीप यादव ने अहम विकेट लिए, शिवम दुबे ने भी एक विकेट लिया, लेकिन न्यूजीलैंड ने मजबूत अंत किया।

Web Title : New Zealand sets 209 target for India in crucial T20I.

Web Summary : New Zealand scored 208/6 against India in the second T20I, setting a 209-run target. Rachin Ravindra's 44 and contributions from Conway and Seifert powered the innings. Kuldeep Yadav took key wickets, while Shivam Dube also contributed with a wicket, but New Zealand finished strongly.