Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ : कोण आहे Kristian Clarke? ज्यानं 'रो-को'ला रोखून दाखवत राजकोटचं मैदान गाजवलं

राजकोटच्या मैदानात भारताच्या दोन दिग्गजांसह त्यानं श्रेयस अय्यरचीही केली शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:25 IST

Open in App

IND vs NZ 2nd ODI Who Is Kristian Clarke Take Virat Kohli And Rohit Sharma Wicket : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना राजकोटच्या मैदानात रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ना हिटमॅन रोहितचा हिट शो पाहायला मिळाला ना विराट कोहलीचा जलवा दिसला. पण या दोघांना रोखून दाखवत न्यूझीलंडच्या ताफ्यातील क्रिस्टियन क्लर्क याने हवा केली.  २४ वर्षीय गोलंदाजासाठी हा वनडे सामना अविस्मरणीय आहे कारण 'रो-को'ला त्याने रोखून दाखवलं आहे. कोण आहे हा गोलंदाज? जाणून घेऊयात किवींच्या ताफ्यातील गोलंदाजाबद्दलची खास स्टोरी

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

हिटमॅन रोहितच्या रुपात क्रिस्टियन क्लर्कनं टीम इंडियाला दिला पहिला धक्का

न्यूझीलंडच्या दुसऱ्या वनडे सामन्यात नाणफेक गमावल्यावर भारतीय संघाकडून कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मानं अगदी संयमी अंदाजात डावाची सुरुवात केली. जोडी सेट झाली आहे, असे वाटत असताना क्रिस्टियन क्लर्क याने रोहित शर्माच्या रुपात टीम इंडियाला मोठा धक्का दिला. दुसरा वनडे सामना खेळणाऱ्या गोलंदाजाची दुसऱ्या वनडेतील आपल्या कारकिर्दीतील ही दुसरी विकेट ठरली. पहिल्या सामन्यात त्याने हर्षित राणाच्या  रुपात विकेट घेतली होती. 

ICC ODI Rankings: विराट कोहली पुन्हा बनला वनडेचा किंग! हिटमॅन रोहितला बसला फटका

किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा षटकारही रोखला!

क्रिस्टियन क्लर्क याने आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवताना उप कर्णधार श्रेयस अय्यरच्या रुपात दुसऱ्या वनडेत दुसरी विकेट आपल्या खात्यात जमा केली. त्यानंतर किंग कोहलीला एका अप्रतिम चेंडूवर बोल्ड करत त्याने कारकिर्दीतील दुसरा सामना अविसरणीय करणारी कामगिरी केली. मागील पाच वनडे सामन्यात सातत्याने ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीच्या खेळीला त्याने अवघ्या २३ धावांवर ब्रेक लावला. 

कोण आहे क्रिस्टियन क्लर्क? ज्यानं दुसऱ्या वनडेत केली हवा?

न्यूझीलंडमधील वायकाटो परिसरातील वेगवान गोलंदाज क्रिस्टियन क्लर्क याची वयाच्या १६व्या वर्षी न्यूझीलंडच्या अंडर-१९ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी (U19 National Championship) नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्सकडून झाली होती. या स्पर्धेत त्याने फक्त ४ विकेट्स घेतल्या. राष्ट्रीय स्तरावरील शालांत स्पर्धेतील २०१८-१९ च्या हंगामात हॅमिल्टन बॉइज हायस्कूलकडून खेळताना क्लर्कने खास छाप सोडली होती. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्यावर न्यूझीलंड अंडर १९ संघात त्याची निवड झाली.  २०२० मध्ये त्याने न्यूझीलंडच्या संघाकडून अंडर-१९ विश्वचषक स्पर्धाही खेळली. या स्पर्धेत त्याने ७ विकेट्स घेतल्या  होत्या. या स्पर्धेतील त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. २५ धावा खर्च करून ४ विकेट्सचा डाव साधल्यावर फलंदाजीत त्याने दहाव्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी रचताना ४६ धावांची दमदार भागीदारी नोंदवली होती. 

इंग्लंडविरुद्ध वनडे संघात स्थान मिळाले, पण टीम इंडियाविरुद्ध मिळाली पदार्पणाची संध

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये क्लर्कने आतापर्यंत ७९ विकेट्स (सरासरी ३२.९) घेतल्या आहेत, तर ३४ लिस्ट ‘ए’ सामन्यांत ५२ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. २०२३-२४ फोर्ड ट्रॉफी (न्यूझीलंडची देशांतर्गत लिस्ट ‘ए’ स्पर्धा) मध्ये तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. या कामगिरीच्या जोरावर ऑक्टोबरमध्ये त्याला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघात बोलावण्यात आले. अखेर टीम इंडियाविरुद्धच्या वडोदराच्या मैदानातील सामन्यातून त्याने वनडेत पदार्पण केले. दुसऱ्या सामन्यातच त्याने आपल्यातील धमक दाखवली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : IND vs NZ: Kristian Clarke stuns India, dismisses Kohli, Rohit.

Web Summary : Kristian Clarke, a 24-year-old New Zealand bowler, rattled India by taking the crucial wickets of Rohit Sharma and Virat Kohli in the second ODI. Clarke's impressive performance showcased his potential after a strong showing in domestic cricket and Under-19 competitions.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीरोहित शर्मा