IND vs NZ, 1st Test Live Updates : भारत-न्यूझीलंड मालिका 'कसोटी वर्ल्ड कप'साठी महत्त्वाची; जाणून घ्या टीम इंडिया आहे कितव्या स्थानी 

India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून कानपूर येथे सुरुवात झाली. जागितक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC 2020-21) मागील पर्वातील अंतिम सामन्यानंतर उभय संघ प्रथमच समोरासमोर आले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 11:01 AM2021-11-25T11:01:46+5:302021-11-25T11:02:03+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 1st Test Live Updates : ICC World Test Championship Points Table before India vs New Zealand first Test  | IND vs NZ, 1st Test Live Updates : भारत-न्यूझीलंड मालिका 'कसोटी वर्ल्ड कप'साठी महत्त्वाची; जाणून घ्या टीम इंडिया आहे कितव्या स्थानी 

IND vs NZ, 1st Test Live Updates : भारत-न्यूझीलंड मालिका 'कसोटी वर्ल्ड कप'साठी महत्त्वाची; जाणून घ्या टीम इंडिया आहे कितव्या स्थानी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून कानपूर येथे सुरुवात झाली. जागितक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC 2020-21) मागील पर्वातील अंतिम सामन्यानंतर उभय संघ प्रथमच समोरासमोर आले आहे. WTC 2021-23 (ICC World Test Championship)   स्पर्धेची सुरुवात भारत-इंग्लंड मालिकेनं झाली आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील टीम इंडियाची ही दुसरी मालिका आहे. त्यामुळे जेतेपदाच्या सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. पण, या मालिकेत भारतीय संघ अपयशी ठरल्यास काय होऊ  शकतं?; चला जाणून घेऊया...

ICC World Test Championship स्पर्धेतील न्यूझीलंडची ही पहिलीच मालिका आहे. भारतानं इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. पाचवा सामना कोरोनामुळे स्थगित करावा लागला. तो सामना पुढील वर्षी होणार आहे.  भारत-इंग्लंड मालिकेत दोन्ही संघांना गुण कमावण्यात यश आलं. याच कालावधीत फाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका झाली होती. या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक विजय मिळवून गुणांचे खाते उघडले होते.       

भारतीय संघानं चार सामन्यांत दोन विजय व एक ड्रॉ निकालासह २६ गुणांची कमाई करताना गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. भारताच्या खात्यात २६ गुण आहेत. त्यानंतर  पाकिस्तान व वेस्ट इंडिज प्रत्येकी १२ गुणांसह दुसऱ्या व तिसऱ्या तर इंग्लंड १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचे गुणांची टक्केवारी ५४.१७ अशी आहे. पाकिस्तान-वेस्ट इंडिजची टक्केवारी ५०-५० अशी आहे, तर इंग्लंडची टक्केवारी ही २९.१७ अशी आहे.

आयसीसीनं गुणपद्धतीत केलाय बदल 
प्रत्येक संघाला समान कसोटी सामने मिळणार नसल्याने गुणतालिकेतील तफावत टाळण्यासाठी आयसीसीने प्रत्येक सामन्याला समान गुण दिले. त्यानुसार प्रत्येक विजयासाठी १२ तर टायसाठी समान ६-६ गुण असतील. सामना अनिर्णीत राहिल्यास ४-४ गुण असतील. गुणांसोबतच टक्केवारीही निश्चित करण्यात आली. त्यानुसार १२ गुणांना शंभर टक्के, सहा गुणांना ५० टक्के आणि चार गुणांना ३३.३३ टक्के दिले जातील. दोन सामन्यांच्या मालिकेत २४, तीन सामन्यांच्या मालिकेत ३६, चार सामन्यांच्या मालिकेसाठी ४८ तसेच पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ६० गुण असणार आहेत.

Web Title: IND vs NZ, 1st Test Live Updates : ICC World Test Championship Points Table before India vs New Zealand first Test 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.