IND vs NZ , 1st Test Live Upadets : श्रेयस अय्यरचे पदार्पणातच शतक, कानपूर कसोटीत रचला इतिहास 

India vs New Zealand , 1st Test Live Upadets : पदार्पण श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 10:10 AM2021-11-26T10:10:00+5:302021-11-26T10:11:06+5:30

IND vs NZ , 1st Test Live Upadets : Maiden Test century in 157 balls by Shreyas Iyer in his debut innings, he becomes the 16th Indian to score a century on Test debut | IND vs NZ , 1st Test Live Upadets : श्रेयस अय्यरचे पदार्पणातच शतक, कानपूर कसोटीत रचला इतिहास 

IND vs NZ , 1st Test Live Upadets : श्रेयस अय्यरचे पदार्पणातच शतक, कानपूर कसोटीत रचला इतिहास 

Next

India vs New Zealand , 1st Test Live Upadets : पदार्पण श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.  

पदार्पणवीर श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि शुबमन गिल यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीनंतर टीम इंडियानं कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी ४ बाद २५८ धावा केल्या. न्यूझीलंडच्या कायले जेमिन्सननं तीन विकेट्स घेत टीम इंडियाला सुरुवातीला धक्के दिले. मयांक अग्रवाल ( १३)  झेलबाद झाला. शुबमन व चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३३ चेंडूंत ६१ धावा जोडल्या. शुबमनला ५२ धावांवर माघारी फिरावे लागले. पुजारा व अजिंक्य रहाणे ही अनुभवी जोडी कमाल करेल असे वाटत होते, परंतु पुजारा २६ आणि अजिंक्य ३५ धावांवर बाद झाला. अय्यर आणि जडेजा या जोडीनं किवी गोलंदाजांना दाद दिली नाही. या दोघांनी शतकी भागीदारी केली.

दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीच्या षटकातच टीम साऊदीनं ही जोडी तोडली. अम्पायर कॉलमुळे जीवदान मिळालेला रवींद्र जडेजा  ५० धावांवर त्रिफळाचीत झाला. शुबमन गिल व अजिंक्य रहाणे यांच्याप्रमाणेच चेंडू जडेजाच्या बॅटीला लागून यष्टींवर आदळला. जडेजा बाद झाल्यानंतर श्रेयसनं आक्रमक खेळ केला. 

English summary :
Hundred for Shreyas Iyer on his Test debut, 100* from 157 balls including 12 fours and 2 sixes - India was 145 for 4 then he made this terrific hundred, dream start in the Test career.

Web Title: IND vs NZ , 1st Test Live Upadets : Maiden Test century in 157 balls by Shreyas Iyer in his debut innings, he becomes the 16th Indian to score a century on Test debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app