Join us  

IND vs NZ , 1st Test Live Upadets : श्रेयस अय्यरच्या विक्रमी शतकानंतरही टीम इंडियाची गाडी घसरली; टीम साऊदीच्या भेदक माऱ्यामुळे किवींनी मुसंडी मारली

India vs New Zealand , 1st Test Live Upadets : टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि न्यूझीलंडकडून टीम साऊदी ( Tim Southee) यांनी कानपूर कसोटीचा दुसरा दिवस गाजवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 12:23 PM

Open in App

India vs New Zealand , 1st Test Live Upadets : टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि न्यूझीलंडकडून टीम साऊदी ( Tim Southee) यांनी कानपूर कसोटीचा दुसरा दिवस गाजवला. २०१७नंतर कसोटी संघात स्थान पटकावताना पदार्पण करणाऱ्या श्रेयसनं शतक झळकावून टीम इंडियाचा डाव सावरला. त्याला रवींद्र जडेजाची उत्तम साथ लाभली. पण, सुरुवातीच्याच काही षटकांत टीम साऊदीनं भारताला चार धक्के दिले आणि पाच विकेट्स पूर्ण केल्या. १९८०नंतर कानपूर कसोटीत पाच विकेट्स घेणारा तो पहिला परदेशी जलदगती गोलंदाज ठरला. आर अश्विननं  तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन संघर्ष केला अन् टीम इंडियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. 

पदार्पणवीर श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि शुबमन गिल यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीनंतर टीम इंडियानं कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी ४ बाद २५८ धावा केल्या. न्यूझीलंडच्या कायले जेमिन्सननं तीन विकेट्स घेत टीम इंडियाला सुरुवातीला धक्के दिले. मयांक अग्रवाल ( १३)  झेलबाद झाला. शुबमन व चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३३ चेंडूंत ६१ धावा जोडल्या. शुबमनला ५२ धावांवर माघारी फिरावे लागले. पुजारा व अजिंक्य रहाणे ही अनुभवी जोडी कमाल करेल असे वाटत होते, परंतु पुजारा २६ आणि अजिंक्य ३५ धावांवर बाद झाला. अय्यर आणि जडेजा या जोडीनं किवी गोलंदाजांना दाद दिली नाही. या दोघांनी शतकी भागीदारी केली.

दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीच्या षटकातच टीम साऊदीनं ही जोडी तोडली. अम्पायर कॉलमुळे जीवदान मिळालेला रवींद्र जडेजा  ५० धावांवर त्रिफळाचीत झाला. शुबमन गिल व अजिंक्य रहाणे यांच्याप्रमाणेच चेंडू जडेजाच्या बॅटीला लागून यष्टींवर आदळला. जडेजा बाद झाल्यानंतर श्रेयसनं आक्रमक खेळ केला.  श्रेयस १७१ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १०५ धावांवर माघारी परतला. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. वृद्धीमान सहा ( १) व अक्षर पटेल ( ३) हेही टीम साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाले. भारताचे ८ फलंदाज ३१३ धावांवर माघारी परतले. १९८०नंतर कानपूर येथे एका डावात पाच विकेट्स घेणारा टीम साऊदी हा  पहिलाच परदेशी जलदगती गोलंदाज ठरला ( Tim Southee removes Axar Patel to become the first visiting fast bowler to take a five-wicket haul in Kanpur since Jan 1980) 

आर अश्विन संघर्ष कराताना  ३८ धावा करून संघाच्या धावसंख्येत भर घातली. अजाझ पटेलनं त्याची विकेट घेतली. पहिल्या दिवसाच्या ४ बाद २५८ धावांवरून आज टीम इंडियाचे सहा फलंदाज ८७ धावांत माघारी परतले. न्यूझीलंडनं चांगला कमबॅक करताना टीम इंडियाला ३४५ धावांवर रोखले.  

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडश्रेयस अय्यर
Open in App