IND vs NZ, 1st T20I : हार्दिकनंतर आणखी एका दिग्गजाने पृथ्वी शॉला संघातून वगळलं; ट्वेंटी-२० साठी निवडली Playing XI

India vs New Zealand, 1st T20I Live : भारतीय संघ आज न्यूझीलंड विरुद्ध पहिला ट्वेंटी-२० सामना खेळणार आहे. हार्दिक पांड्या टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे, तर मिचेल सँटनर न्यूझीलंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 03:49 PM2023-01-27T15:49:31+5:302023-01-27T15:49:59+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 1st T20I : Wasim Jaffer picks his playing XI for first T20I against New Zealand, included Mavi, Kuldeep, Arshdeep, and Umran Malik in his bowling arsenal | IND vs NZ, 1st T20I : हार्दिकनंतर आणखी एका दिग्गजाने पृथ्वी शॉला संघातून वगळलं; ट्वेंटी-२० साठी निवडली Playing XI

IND vs NZ, 1st T20I : हार्दिकनंतर आणखी एका दिग्गजाने पृथ्वी शॉला संघातून वगळलं; ट्वेंटी-२० साठी निवडली Playing XI

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 1st T20I Live : भारतीय संघ आज न्यूझीलंड विरुद्ध पहिला ट्वेंटी-२० सामना खेळणार आहे. हार्दिक पांड्या टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे, तर मिचेल सँटनर न्यूझीलंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे. ऋतुराज गायकवाडला दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घ्यावी लागल्याने पृथ्वीला ओपनिंगला संधी मिळेल अशी शक्यता होती, पण कर्णधार हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) त्यावर पाणी फिरवले. आता भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आणि त्यानेही पृथ्वीला संघाबाहेर ठेवले. 

दोन वर्षांपासून पृथ्वी शॉ भारतीय संघातून बाहेर आहे. २५ जुलै २०२१ मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध पहिला व अखेरचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळला होता. त्यानंतर त्याने रणजी करंडक, मुश्ताक अली, विजय हजारे चषक या स्थानिक स्पर्धा गाजवल्या. २०२३ मध्ये भारतीय संघात निवड होण्यापूर्वी त्याने शतकांचा पाऊस पाडला होता, बीसीसीआय सचिव जय शाह यांनीही त्याचे कौतुक केले होते. त्यानंतर किवींविरुद्ध ट्वेंटी-२० संघात त्याची निवड झाली, परंतु प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळणे अवघड आहे. हार्दिक म्हणाला, उद्याच्या सामन्यात शुभमन गिल व इशान किशन हे सलामीला येतील.


वसीम जाफरने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये इशान किशन आणि शुभमन गिल यांची सलामीसाठी निवड केली आहे. हे दोन्ही खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. तिसऱ्या क्रमांकासाठी त्याने राहुल त्रिपाठीला संधी दिली आहे. चौथ्या क्रमांकासाठी सूर्यकुमार यादवला संधी दिली आहे. सूर्या गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहे. गतवर्षी तो ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. कर्णधार हार्दिक पंड्या पाचव्या क्रमांकावर उतरू शकतो.  अष्टपैलू खेळाडू म्हणून दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना वसीम जाफरने प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. वसीम जाफरने वेगवान गोलंदाजीसाठी उम्रान मलिक, शिवम मावी आणि अर्शदीप सिंग यांची निवड केली आहे.  



प्लेइंग इलेव्हन:  हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग आणि शिवम मावी. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs NZ, 1st T20I : Wasim Jaffer picks his playing XI for first T20I against New Zealand, included Mavi, Kuldeep, Arshdeep, and Umran Malik in his bowling arsenal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.