Join us  

IND vs NZ 1st T20I Live : ४ चेंडूंच्या फरकाने सूर्यकुमार यादव अन् हार्दिक पांड्या परतले; ५ फलंदाज बाद करत किवींचे वर्चस्व, Video

India vs New Zealand 1st T20I Live : न्यूझीलंडने १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताची अवस्था ३ बाद १५ धावा अशी दयनीय केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 10:00 PM

Open in App

India vs New Zealand 1st T20I Live : न्यूझीलंडने १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताची अवस्था ३ बाद १५ धावा अशी दयनीय केली होती. सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्यावर मदार होती. तुफान फॉर्मात असलेल्या सूर्यकुमारविरुद्ध सँटनरने निर्धाव षटक टाकून सर्वांना अचंबित केले. सूर्या व हार्दिक या जोडीला तोडण्यासाठीचे किवींचे प्रयत्न अपयशी ठरताना दिसले होते. पण, सामना फिरला अन् ४ चेंडूंच्या फरकाने दोन्ही सेट फलंदाज माघारी परतले. 

 किवींनी फास आवळला, भारताचे १५ धावांत ३ फलंदाज पाठवले माघारी; Video

डॅरील मिचेल आणि डेव्हॉन कॉनवे या जोडीने भारताच्या गोलंदाजांची धुलाई केली, परंतु वॉशिंग्टन सुंदरच्या  ( Washington Sundar ) एका षटकाने मॅच फिरवली. कॉनवे अर्धशतक झळकावून माघारी परतला. न्यूझीलंडने पहिल्या ट्वेंटी-२०त भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी करण्यात यश मिळवले. डॅरील मिचेलने अखेरच्या षटकांत चांगले फटके मारले अन् अर्धशतक पूर्ण केले. अर्शदीप सिंगच्या अखेरच्या षटकात त्याने २७ धावा चोपल्या. फिन ॲलन ( ३५) आणि कॉनवे यांनी आक्रमक सुरुवात केली होती. वॉशिंग्टन सुंदरने त्याच्या एकाच षटकात दोन धक्के देत भारताला कमबॅक करून दिले.  

कॉनवे व ग्लेन फिलिप्स यांची ६० धावांची भागीदारी कुलदीप यादवने तोडली. डॅरील मिचेल व कॉनवे यांनी दमदार खेळ केला. कॉनवे ५२ धावांवर बाद झाला. सुंदरने ४-०-२२-२  आणि कुलदीपने ४-०-२०-१ अशी कामगिरी केली. अर्शदीपच्या २०व्या षटकात मिचेलेने २७ धावा चोपून न्यूझीलंडला ६ बाद १७६ धावा उभ्या करून दिल्या. मिचेल ५९ धावांवर नाबाद राहिला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात अपेक्षित नाही झाली. मायकेल ब्रेसवेलने दुसऱ्या षटकात इशान किशनला ( ४) त्रिफळाचीत केले, तर जेकब डफीने तिसऱ्या षटकात राहुल त्रिपाठीला ( ०) माघारी पाठवून भारताची अवस्था २ बाद ११ अशी केली. मिचेल सँटनरने पुढील षटकात भारताला तिसरा धक्का दिला, शुभमन गिल ७ धावांवर बाद झाला. 

 

सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्यावर मदार होती. तुफान फॉर्मात असलेल्या सूर्यकुमारविरुद्ध सँटनरने निर्धाव षटक टाकून सर्वांना अचंबित केले. सूर्या व हार्दिक या जोडीला तोडण्यासाठीचे किवींचे प्रयत्न अपयशी ठरताना दिसले. या जोडीने अर्धशतकी भागीदारी करताना संघाला १० षटकांत ३ बाद ७४ धावांपर्यंत पोहोचवले. सूर्याने १२व्या षटकात इश सोढीच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार खेचला. पण, पुढच्याच षटकात सोढीने त्याला माघारी पाठवले. सूर्या  ३४ चेंडूंत ४७ धावा करून माघारी परतला. मायकेल ब्रेसवेलने पुढच्या षटकात हार्दिकला ( २१) चूक करण्यास भाग पाडले अन् उत्तुंग उडालेला चेंडू ब्रेसवेलनेच झेलला. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्यासूर्यकुमार अशोक यादव
Open in App