Join us  

IND vs NZ, 1st T20I Live : हातातून रक्त वाहत असूनही प्राथमिक उपचार घेत मोहम्मद सिराजनं पूर्ण केलं षटक; राहुल द्रविडनंही थोपटली पाठ

India vs New Zealand 1st T20I Live Update : भारतानं मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात मोहम्मद सिराजचे ( Mohammad Siraj) साऱ्यांनी कौतुक केलं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 11:19 PM

Open in App

India vs New Zealand 1st T20I Live Update : राहुल द्रविड ( मुख्य प्रशिक्षक) व रोहित शर्मा ( फुल टाईम कर्णधार) यांनी नव्या इंनिंगच्या पहिल्याच परिक्षेत विजय मिळवला. न्यूझीलंडनं तगडं आव्हान उभं करूनही रोहित ( Rohit Sharma) व सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी दमदार खेळ केला. रोहितच्या हुकलेल्या अर्धशतकाची भरपाई सूर्यकुमारनं टोलेजंगी फटकेबाजीनं केली आणि रिषभ पंतनं फिनिशिंग टच देत भारताचा ५ विकेट्सनं विजय पक्का केला. भारतानं मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात मोहम्मद सिराजचे ( Mohammad Siraj) साऱ्यांनी कौतुक केलं. 

मार्क चॅपमॅन ( Mark Chapman)  व मार्टीन गुप्तील ( Martin Guptill ) यांची शतकी भागीदारी आणि वैयक्तिक अर्धशतकी खेळीनं टीम इंडियाच्या गोलंदाजांची वाईट अवस्था केली. पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा सलामीवीर डॅरील मिचेल ( ०) याचा त्रिफळा उडवला. पण, चॅपमॅन व मार्टीन गुप्तील यांनी चांगली फटकेबाजी केली. चॅपमॅन ५० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारासह ६३ धावांवर त्रिफळाचीत झाला. अश्विननं त्याच्या वाट्याच्या चार षटकांत २३ धावा देत २ विकेट्स घेतल्या. गुप्तीलनं  ४२ चेंडूंत ३ चौकार ४ षटकारासह ७० धावा केल्या. चहरनं ४ षटकांत सर्वाधिक ४२ धावा देत १ विकेट घेतली. न्यूझीलंडनं २० षटकांत ६ बाद १६४ धावा केल्या. सिराजनंही ४ षटकांत ३९ धावा देत १ विकेट घेतली. 

२०व्या षटकात पहिल्या चेंडूवर मिचेल सँटनरनं मारलेला चेंडू सिराजनं अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या प्रयत्नात त्याच्या हातातून रक्त वाहू लागला. प्राथमिक उपचार घेत सिराजनं ते षटक पूर्ण केलं आणि अवघ्या पाच धावा देत एक विकेटही घेतली. 

प्रत्युत्तरात रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी वादळी सुरुवात केली. या दोघांनी पाच षटकांत धावफलकावर अर्धशतकी आकडा चढवला. रोहितच्या सुरेख फटक्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. मिचेल सँटनरनं टीम इंडियाला पहिला धक्का देताना लोकेशला १५ धावांवर बाद केले. रोहित ३६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४८ धावांवर बाद झाला. पण, सूर्यानं ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून प्रेक्षकांनी वाहवान मिळवली. सूर्यकुमारनं ४० चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ६२ धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत ही नवी जोडी खेळपट्टीवर होती आणि त्यांच्यावर दडपण निर्माण करण्यात किवी गोलंदाजांनी यश मिळवले होते. १२ चेंडूंत १६ धावा टीम इंडियाला बनवायच्या होत्या आणि टीम साऊदीनं १९व्या षटकात ६ धावा देताना एक विकेट घेतली. ४ चेंडू ५ धावा हव्या असताना मिचेलनं Wide टाकला. त्यानंतर ३ चेंडूंत ३ धावा हव्या असताना रिषभनं चौकार खेचून भारताचा विजय पक्का केला. रिषभ १७ धावांवर नाबाद राहिला.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडमोहम्मद सिराजराहूल द्रविडरोहित शर्मा
Open in App