India vs New Zealand 1st T20I Live : वन डे मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, यावेळी अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला किवींचा सामना करायचा आहे. त्यामुळे यजमानांसाठी हे आव्हान सोपं नक्की नसेल. २००७ मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी२० सामना खेळला गेला होता. तेव्हापासून या दोघांमध्ये २२ सामने खेळले गेले. त्यापैकी १२ सामने भारताने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडला ९ सामने जिंकण्यात यश आले. या २२ पैकी केवळ एक सामना अनिर्णित राहिला.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होता. ते दोघांमध्ये तीन ट्वेंटी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली. या मालिकेतील पहिला आणि शेवटचा सामना पावसामुळे खेळला गेला नाही. पण दुसऱ्या सामन्यात भारताने बाजी मारली आणि ही मालिका १-० अशी खिशात घातली. आजच्या सामन्यात इशान किशन व शुभमन गिल ही फॉर्मात असलेल्या खेळाडूंची जोडी सलामीला उतरेल, हे हार्दिकने कालच स्पष्ट केले आहे. त्यामुळे
पृथ्वी शॉला संधी मिळणे अवघड मानले जात आहे. अशात मधल्या फळीत सूर्यकुमार यादवसह कोण जबाबदारी सांभाळेल याची उत्सुकता आहे. दीपक हुडा हा शर्यतीत आहे.
ही खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असेल असे अजित आगरकरने सामन्यापूर्वी सांगितले होते. पण, हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, जितेश शर्मा व
पृथ्वी शॉ यांना आजच्या सामन्यात संधी दिलेली नाही.
भारताची प्लेइंग इलेव्हन - शुभमन गिल, इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, शिवम मावी, उम्रान मलिक व अर्शदीप सिंग
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"