Join us
Daily Top 2Weekly Top 5

Abhishek Sharma New Record : षटकारांची आतषबाजी! अभिषेक शर्मानं मोडला गुरु युवराज सिंगचा रेकॉर्ड

भारताकडून T20I मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या बॅटरच्या यादीत टॉप ५ मध्ये पोहचला अभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 19:51 IST

Open in App

IND vs NZ 1st T20I Abhishek Sharma New Record : नागपूरच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्मा न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. या सामन्यातील पहिल्या षटकातील अखेरच्या चेंडूवर षटकार मारत त्याने खाते उघडले. आतापर्यंतच्या आपल्या अल्प कारकिर्दीत सातव्यांदा त्याने डावाची सुरुवात ही षटकाराने केली. एवढेच नाही तर पॉवर प्लेमध्ये षटकारांची बरसात करताना त्याने गुरु युवराज सिंगचा विक्रमही मोडीत काढल्याचे पाहायला मिळाले. 

पॉवर प्लेमध्ये षटकारांची आतषबाजी

पहिल्यांदा फलंदाजी करताना संजू सॅमसन आणि इशान किशन यांनी बॅक टू बॅक आपली विकेट गमावल्यावर अभिषेक शर्मानं आपला हिट शो कायम ठेवला. पॉवर प्लेमध्ये १५ चेंडू खेळताना त्याने २०० च्या स्ट्राइक रेटनं धावा करताना ४ षटकार मारले. पहिल्या दोन षटकारांसह त्याने युवराज सिंगचा मोठा विक्रम मोडीत काढला. एवढ्यावरच न थांबता त्याने २२ चेंडूत अर्धशतकही पूर्ण केले. नव्या वर्षात भारतीय संघाकडून पहिले अर्धशतक त्याच्या बॅटमधून आले आहे. 

भारताकडून T20I मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या बॅटरच्या यादीत टॉप ६ मध्ये पोहचला अभिषेक

या सामन्या आधी अभिषेक शर्माने ३३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळत ७३ षटकार मारले होते. या सामन्यात पहिल्या दोन षटकारांसह त्याने युवराज सिंगला मागे टाकले. युवीनं आपल्या टी-२० कारकिर्दीत ५८ सामन्यात ७४ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे. गुरु युवराज सिंगला मागे टाकत अभिषेक शर्मा आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकरा मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आघाडीच्या सहा फलंदाजांमध्ये पोहचला आहे. या यादीत रोहित शर्मा सर्वात आघाडीवर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत २०५ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Abhishek Sharma's Sixes Break Record: Surpasses Yuvraj Singh!

Web Summary : Abhishek Sharma began his T20I career with a six, marking his seventh such start. He surpassed Yuvraj Singh in powerplay sixes and scored a half-century off 22 balls. Sharma now ranks among India's top six T20I six-hitters.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडअभिषेक शर्मा